आज दि.२४ मार्च च्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा…

परमबीर सिंह प्रकरणाचा
तपास सीबीआय करणार

सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्र सरकारला मोठा झटका दिला आहे, परमबीर सिंह प्रकरणाचा तपास सीबीआय करणार आहे. या प्रकरणाची सुनावणी आज सुप्रीम कोर्टात झाली. या संपूर्ण प्रकरणाची तपासणी निष्पक्ष व्हावी असं कोर्टाने म्हटलं आहे. कारण या प्रकरणात जे आरोप आहेत ते राज्यातील यंत्रणेवर आहेत, राज्याच्या गृहमंत्र्यांवर आहेत. या प्रकरणाच्या मूळापर्यंत जाण्याचं गरजेचं असल्याने हा तपास सीबीआयकडे देण्यात आल्याचं सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे.

पुतीन यांच्यावर विष प्रयोगाची
शक्यता 1000 कर्मचारी निलंबित

युक्रेनवर हल्ला केल्यानंतर आता रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांना भलत्याच गोष्टीची धास् लागली आहे. अण्वस्त्र हल्ल्यांच्या भीतीनं सध्या पुतीन यांनी आपल्या कुटुंबाला सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत केलं आहे. त्यांच्या मनात असणाऱी भीती आता इतकी वाढली आहे की, खासगी सेवेत असणाऱ्या जवळपास 1000 कर्मचाऱ्यांनाही त्यांनी तातडीनं निलंबित केलं आहे. कर्मचाऱ्यांकडून आपल्यावर कोणत्याही क्षणी विषप्रयोग केला जाऊ शकतो, या भीतीनं त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं आहे.

न्यायमूर्तींनी अप्रत्यक्षपणे
संजय राऊत यांना फटकारले

न्यायमूर्ती संजय किशन कौल आणि न्यायमूर्ती एम.एम.सुंदरेश यांच्या खंडपीठासमोर परमबीर सिंग यांच्या याचिकेवर सुनावणी सुरु आहे. यावेळी खंडपीठाने संजय राऊत यांच्या वक्तव्याचा दाखला देत आपली नाराजी व्यक्त केली. “प्रसारमाध्यमांमध्ये आलेल्या बातम्यांची आम्हाला चिंता वाटत नाही. परवा महाराष्ट्र सरकारमधील एका व्यक्तीने असं वक्तव्य केलं की आता त्यांना न्यायालयाकडून योग्य न्याय मिळेल अशी अपेक्षा नाही. आम्ही हे वाचलं, पण या गोष्टींमुळे आम्हाला काही फरक पडत नाही. अशा वक्तव्यांची जागा आमच्यासाठी केराची टोपली आहे”, असे म्हणत कोर्टाने संजय राऊतांना फटकारले.

योगी आदित्यनाथ २५ मार्चला
दुसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार

योगी आदित्यनाथ यांचा शपथविधी धुमधडाक्यात आणि मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. अनेक मोठमोठे लोक उपस्थित राहणार आहेत. योगी आदित्यनाथ २५ मार्च रोजी लखनौच्या एकना इंटरनॅशनल स्टेडियमवर दुसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. या सोहळ्यामध्ये १२ राज्यांचे मुख्यमंत्री सहभागी होणार आहेत. योगगुरू रामदेव बाबा तसंच विविध मठ आणि मंदिरांचे महंतही उपस्थित राहणार आहेत.

सत्यपाल मलिक यांना लाच दिल्याच्या
आरोपाच्या सीबीआय चौकशीचे आदेश

जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते अंबानी यांच्याशी संबंधित फाइल्स क्लिअर करण्यासाठी आपल्याला ३०० कोटी रुपयांची लाच देऊ करण्यात आली होती असा दावा केला होता. त्यानंतर सत्यपाल मलिक यांना लाच दिल्याच्या आरोपाच्या सीबीआय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. संपूर्ण प्रकरणाचा निष्पक्ष तपास करण्यासाठी खुद्द जम्मू-काश्मीर प्रशासनाने सीबीआयकडे या प्रकरणाची चौकशी करण्याची शिफारस केली आहे.

केवळ २ वर्षात चंद्रावर
मिळणार वायफाय सुविधा

अमेरिकेच्या एका स्टार्टअप कंपनीने दावा केला आहे की ते पुढील २ वर्षांच्या आत चंद्रापर्यंत वायफाय सुविधा पोहचवेल. म्हणजेच ही कंपनी चंद्रावर हाय-स्पीड इंस्टारनेट सुविधा पुरवणार असल्याचा दावा करत आहे. अ‍ॅक्वेरिअन स्पेस नावाची या कंपनीने सांगितले की ते केवळ २ वर्षात चंद्रावर वायफाय आणतील आणि त्यानंतर मंगळावर इंटरनेट सुविधा उपलब्ध करून देण्याचे त्यांचे पुढील लक्ष्य असेल. या प्रकल्पासाठी कंपनीला ६५०,००० डॉलर, भारतीय चालनानुसार सुमारे ५० दशलक्ष रुपये निधी मिळाला आहे.

महेंद्रसिंह धोनी CSK चे
कर्णधार पद सोडणार

महेंद्रसिंह धोनीनं त्याच्या चाहत्यांना अजून एक मोठा धक्का दिला आहे. आयपीएलचा यंदाचा हंगाम अगदी तोंडावर आलेला असताना महेंद्रसिंह धोनीनं CSK अर्थात चेन्नई सुपर किंग्जच्या कर्णधारपदावरून पायउतार होत असल्याचं जाहीर केलं आहे. धोनीनं चेन्नईचं कर्णधारपद भारताचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जाडेजाकडे सोपवलं आहे. त्यामुळे आता यंदाच्या आयपीएलमध्ये रवींद्र जाडेजा चेन्नईच्या कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळताना दिसणार आहे.

दिल्ली दंगलीशी संबंधित
उमर खालिदला जामीन नाकारला

उमर खालिदला दिल्ली कोर्टाकडून आणखी एक झटका बसला आहे. दिल्ली दंगलीशी संबंधित प्रकरणात त्याचा जामीन अर्ज पुन्हा फेटाळण्यात आला आहे. दिल्लीतील न्यायालयाने जेएनयूचा माजी विद्यार्थी उमर खालिदला जामीन नाकारला आहे. उमर खालिदवर दंगलीचा कट रचल्याप्रकरणी आणि UAPA अंतर्गत गुन्हा दाखल आहे. उमर खालिदच्या याचिकेवर सुनावणी झाली, त्यानंतर निर्णय आजपर्यंत पुढे ढकलण्यात आला होता.

अभिनेत्री स्वरा भास्करचा सामान
घेऊन उबर टॅक्सी ड्रायव्हर फरार

बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. सध्या स्वरा लॉस एंजेलिसमध्ये आहे. तिला तिथे एक वाईट अनुभव आला आहे. स्वराने ट्वीट करत Uber Cab कंपनीला तक्रार दाखल केली आहे. स्वरा म्हणाली, “उबर कंपनीनं कृपया माझी ही तक्रार नोंदवून घ्या. तुमचा एक ड्रायव्हर माझा सगळा सामान घेऊन फरार झाला आहे. तुमच्या अॕपवर तक्रार करण्यासाठी कुठलीच सोय नाही आहे. हे काही मी चुकून विसरले वगैरे नाही. तर तो चक्क माझा सामान घेऊन पळाला आहे.”

‘हत्याकांडामागे मोठं षडयंत्र’; हिंसाग्रस्त भागात पोहोचल्यानंतर ममता बॅनर्जींचं मोठं वक्तव्य

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आज दुपारी बीरभूम हिंसाचारातील बोगतुई गावात पोहोचल्या, जिथं मंगळवारी जमावानं 10 जणांना जिवंत जाळलं. आता या निर्दयी हत्याकांडाच्या राजकीय प्रतिक्रियाही उमटू लागल्या आहेत. राज्य सरकार हिंसाचार आणि अराजकाला मोकळं रान देत ​​असल्याचा आरोप भाजपनं केला आहे. हत्याकांडाच्या तिसऱ्या दिवशी बोगतुई गावात पोहोचलेल्या मुख्यमंत्री बॅनर्जी यांनी या हत्यांमागे काहीतरी ‘खूप मोठं षडयंत्र’ असल्याचं म्हटलं आहे.आजच्या बंगालमध्ये एवढ्या निर्दयीपणे हत्या होऊ शकतात, असं मला कधी वाटलं नव्हतं, असं बॅनर्जी म्हणाल्या. या हत्याकांडात महिला आणि लहान मुलं मारली गेली. कुटुंबातील अनेक सदस्यांचा मृत्यू झाला. पण या हत्याकांडानं माझ्या मनात तीव्र वेदना होत आहेत, असं त्यांनी म्हटलं.

सहा मुलं-पत्नी आणि धनंजय मुंडे, करुणा शर्मा घेऊन येताय प्रेमकहाणीवर पुस्तक!

कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीमुळे राजकीय आखाडा तापला आहे. आता या निवडणुकीत करुणा शर्मा मुंडे यांनी एंट्री केली आहे. करुणा शर्मा मुंडे यांनी आज शेवटच्या दिवशी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तसंच, धनंजय मुंडे यांच्यासोबत प्रेमसंबंधावर पुस्तक येणार आहे, असंही करुणा शर्मांनी जाहीर केलं.

आयपीएलवर कोणत्याही प्रकारचं दहशतवादाचे सावट नाही, मुंबई पोलिसांचं पत्रकाच्या माध्यमातून स्पष्टीकरण

इंडियन प्रीमिअर लीग अर्थात आयपीएल 2022 ची उत्सुकता सर्वांनाच आहे. 26 मार्चपासून सुरू होणाऱ्या आयपीएलपूर्वी आज एक धक्कादायक बातमी समोर आली आणि ती म्हणजे आयपीएल स्पर्धा दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर आहे. या वृत्ताने एकच खळबळ उडाली. त्यानंतर आता याप्रकरणी मुंबई पोलिसांकडून एक पत्रक काढत स्पष्टीकरण दिलं आहे की, आयपीएलवर कोणत्याही प्रकारचं दहशतवादाचं सावाट नाहीये.

SD social media
9850 60 35 90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.