प्रसिद्ध कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचं आपण पाहिलं आहे, त्यानंतर संपुर्ण महाराष्ट्रात या वाक्याची राजकीय चर्चा रंगली होती. तसेच अनेक राजकीय नेत्यांनी हे वक्तव्य अत्यंत चुकीचं असल्याचं म्हणटलं होतं. बंडा तात्या कराडकर यांना प्रत्युत्तर देताना एकनाथ खडसें असे म्हणाले की, “वारकरी संप्रदायाचे बंडा तात्या कराडकर यांनी अपुऱ्या माहितीच्या आधारे अपशब्द वापरले. महाराष्ट्रात असे अनेक नेते आहेत जे मद्याला हात लावत नाहीत. काही घटक असू शकतात पण सर्वांना एकाच माळेत बंडा तात्यांनी गुंतवू नये.” विशेष म्हणजे पिपंरी चिंचवड महानगरपालिकेत आमची सत्ता आल्यास अनेकांना जेलची हवा खावी लागेल असंही वक्तव्य एकनाथ खडसेंनी केलं आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमधील सत्ताधारी भाजपवरती टीका करताना एकनाथ खडसे असे म्हणाले की, स्थायी समिती सभापती लाच प्रकरणी तर माजी उपमहापौर यांना खंडणी प्रकरणी अखेरीस अटक झाली. वरिष्ठांच्या मर्जीशिवाय भ्रष्टाचाराची प्रकरण होऊ शकत नाही. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत आम्ही सत्तेत आल्यास अनेकांना तुरूंगाची हवा खावी लागणार असल्याचं मोठं वक्तव्य एकनाथ खडसेंनी केलंय. पिंपरी चिंचवड मधील एक राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या कार्यालय उद्घाटनाच्या कार्यक्रमाला गेले होते. तिथं त्यांनी देवेंद्र फडणवीसांचं नाव घेतलं नाही, वरीष्ठाच्या मर्जीशिवाय म्हणजे देवेंद्र फडणवीसांना टोला लगावल्याची राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये चर्चा होती.
दुकानात वाइनच्या परवानगीबाबत भाजप विरोध महाराष्ट्रात विरोध करताना दिसत आहे, पण मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश आणि गोव्यात भाजपने परवानगी दिली असून महाराष्ट्रात आरडाओरडा का करता असा सवाल देखील खडसेंनी भाजपच्या नेत्यांना केला आहे. तसेच कोणताही आमदार किंवा मंत्री कोणत्याही मद्याला स्पर्श करणार त्यासाठी त्यांना शपथ द्या असेही ते म्हणाले आहेत. भाजपाचे वापरा आणि सोडून द्या असं धोरण असल्यामुळे भाजपाला रामराम करावा लागला अशी त्यांनी मनातली खदखद बोलून दाखवली.
“प्रसिद्ध कीर्तनकार बंडा तात्या कराडकर यांनी अपुऱ्या माहितीच्या आधारे अपशब्द वापरले आहेत. महाराष्ट्रात असे अनेक नेते आहेत जे मद्याला हात लावत नाहीत. काही घटक असू शकतात, पण सर्वांना एकाच माळेत बंडा तात्यांनी गुंतवू नये असे आवाहन एकनाथ खडसेंनी केले.