बांधकाम स्लॅबची जाळी कोसळून सात मजुरांचा मृत्यू

पुणे शास्त्रीनगर येथील बांधकामाचे स्लॅबची जाळी कोसळून झालेल्या दुर्घटनेत सात मजुरांचा मृत्यू झाला. हे मजूर ढिगाऱ्याखाली गाडले गेलेत. त्यांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेत इतर तीन मजूर गंभीर जखमी झाले आहेत. ही दुर्घटना वाडिया फार्महाउस आवारातील बांधकामाच्या साईडवर घडली.

शास्त्रीनगर या ठिकाणी इमारतीचे बांधकाम सुरु असताना तळमजल्यावर काही मजूर काम करत होते. अचानक इमारतीच्या बांधकामाच्या स्लॅबची जाळी त्यांच्यावर अंगवार कोसळली. या दुर्घटनेत ढिगाऱ्याखाली आठ मजूर अडकले होते. अग्निशमन दल आणि पोलिसांच्या मदतीने अडकलेल्या मजुरांना बाहेर काढून उपचारासाठी ससून रुग्णालयात पाठविण्यात आले. यामध्ये पाच मजुरांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला तर इतर तीन जण गंभीर जखमी आहेत.

दुर्घटना नेमकी कशी घडली हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही.घटनास्थळी अग्निशमन दल व पोलिसांनी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले. ढिगाऱ्याखाली अडकलेले सर्व मजूर बाहेर काढण्यात आलेले आहेत. घटनास्थळी अग्निशमन दल, महापालिका महापालिका आपत्ती व्यवस्थापन तसेच वरिष्ठ पोलीस अधिकारी दाखल झालेत. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरु होते. याप्रकरणी संबंधित दोषी जबाबदार व्यक्तीवर कायदेशीर गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिली. या दुर्घटनेतील मृतदेहांची ओळख पटविण्याचे काम ससून रुग्णालयात सुरु आहे. तसेच गंभीर जखमींवर देखील उपचार सुरू आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.