उष्णतेमुळे शरीराची लाहीलाही होतेय. सूर्यनारायण आग ओकतोय. वाढत्या उकाड्यामुळे सर्वच वैतागलेत. पाऊस कधी पडतोय, आणि कधी थंडावा अनुभवायला मिळतोय, अशी सर्वांची स्थिती झालीय. मात्र दुसऱ्या बाजूला जोरदार अवकाळी पाऊस झालाय. या अवकाळी पावसात अनेक ठिकाणी पाणी साचलंय.
हैदराबादसह तेलंगणाच्या काही जिल्ह्यांना अवकाळी पावसानं चांगलंच झोडपून काढलं. त्यामुळे हैदराबादेतील अनेक भागांमध्ये पाणी साचलंय. अंबरपेट, कुकटपल्ली, मलकजगिरी आणि मुर्शिदाबाद या भागांमधील अनेक घरांत पाणी शिरलं. त्यामुळे नागरिकांचे हाल झालेत.
काही भागांमध्ये तर रबर बोटींचा आधार घेऊन पुरात अडकलेल्यांना बाहेर काढावं लागलंय. असं असलं तरी कडक उन्हाळ्यातून लोकांना मोठा दिलासा मिळालाय.
एकीकडे नागरिकांना उष्णतेपासून दिलासा मिळालेला असला तरी सुद्धा पिकांचे नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जात असल्याने शेतकरीवर्ग काही प्रमाणात हवालदिल झालेला आहे.