आज दि.१५ नोव्हेंबर च्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा….

उद्धव ठाकरेंना मोठा धक्का! धनुष्यबाण चिन्हाबाबत मोठा निर्णय

महाराष्ट्राच्या राजकारणाशी संबंधित सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. शिवसेना पक्षाचे नाव, चिन्ह गोठवण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान देणारी उद्धव ठाकरेंची याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे.

शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर पक्षचिन्हावर दोन्ही गटांनी दावा केला होता. आता याबाबत निवडणूक आयोगाने निर्णय घेत धनुष्यबाणाचं चिन्हच गोठवलं. याविरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने न्यायालयात धाव घेत हा निर्णयच रद्द करण्याविषयी याचिका केली होती. पण उद्धव ठाकरेंच्या पक्षाला धक्का देणारा निर्णय कोर्टाने दिला आहे.

विनयभंग प्रकरणी जितेंद्र आव्हाडांना मोठा दिलासा, अटकपूर्व जामीन मंजूर

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यावर एका महिलेने विनयभंगाची तक्रार दाखल केल्यामुळे एकच खळबळ उडाली. या प्रकरणी आज ठाणे कोर्टामध्ये सुनावणी पार पडली. यावेळी कोर्टाने आव्हाडांना मोठा दिलासा देत पोलीस यंत्रणा आणि भाजपला धक्का दिला आहे.  विनयभंग प्रकरणी आव्हाड यांना जामीन मंजूर केला आहे. अटी आणि शर्तींवर जामीन मंजूर केला आहे.ठाण्यातील पूल उद्घाटनाच्या कार्यक्रमात जितेंद्र आव्हाड यांनी एका महिलेला हात धरून बाजूला केलं होतं. या प्रकरणी आव्हाडांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. याविरोधात त्यांनी कोर्टात धाव घेतली. आव्हाड यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला असून त्यावर आज ठाणे कोर्टामध्ये सुनावणी झाली. कोर्टाने आव्हाड यांचा जामीन अर्ज मंजूर केला आहे.  न्यायाधीश प्रणय गुप्ता यांनी आव्हाडांच्या अटक पूर्व जामीन अर्जावर निर्णय दिला.

काँग्रेसकडून स्टार प्रचारकांची यादी जारी, महाराष्ट्रातील ‘या’ नेत्यांचा समावेश

गुजरात विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. सर्वच प्रमुख पक्षांकडून गुजरात विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू करण्यात आली आहे. यंदा आम आदमी पार्टी देखील गुजरात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यानं चूरस पहायला मिळू शकते. गेल्यावेळी राज्यात भाजपाने एकहाती सत्ता मिळवली होती. यंदा देखील गुजरातमध्ये सत्ता मिळवण्यासाठी भाजपकडून जोरदार मोर्चबांधणीला सुरुवात झाली आहे, दुसरीकडे काँग्रेसने देखील तयारी सुरू केली असून, काँग्रेसकडून गुजरात निवडणुकीसाठी स्टार प्रचारकांची यादी जारी करण्यात आली आहे. यामध्ये एकूण 40 जणांचा समावेश आहे.या यादीमध्ये सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियकां गांधी, द्विगविजय सिंग, मलिक्कार्जून खर्गे, कमलनाथ, मोहन प्रकाश, अशोक चव्हाण, शिवाजीराव मोघे, सचिन पायलट, राजू शर्मा, पवन खेरा, कन्हय्या कुमार, भुपेद्र सिंग हुड्डा, या प्रमुख नेत्यांच्या नावांचा समावेश आहे. या यादीमध्ये महाराष्ट्रातून अशोक चव्हाण आणि शिवाजीराव मोघे यांचा समावेश करण्यात आला आहे.

कोल्हापूर अर्बन बँकेत विरोधकांचा धुव्वा; सत्तारूढ शिंदे-कणेरकर पॅनेलची सरशी

करवीर नगरीतील जुन्या कोल्हापूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या निवडणुकीत शिंदे – कणेरकर आघाडीची सरशी झाली. सर्व १५ जागा मोठ्या फरकाने जिंकून त्यांनी विरोधी निगडे – जाधव गटाला जोरदार धक्का दिला. कोल्हापूर अर्बन बँकेला शतकोत्तर परंपरा आहे. बँकेचा गेल्या काही कालावधीतील कारभार वादग्रस्त झाला होता. सत्ताधारी गटातून बाहेर पडलेल्या संचालकांनी टीका टिप्पणी चालवली होती. त्यामुळे निवडणूक लागण्यापासूनच वातावरण तापले होते.बँकेचे माजी अध्यक्ष शिरीष कणेरकर यांच्या जुन्या पॅनलला माजी अध्यक्ष उमेश निगडे, संचालिका गीतादेवी जाधव यांच्या राजर्षी शाहू भास्करराव जाधव संस्थापक पॅनलने आव्हान दिले होते.रविवारी चुरशीने ४८ टक्के मतदान हे मागील निवडणुकीपेक्षा ८ टक्के अधिक असल्याने निकालाचा कल कसा राहणार याची उत्सुकता होती. मात्र आज कणेरकर -शिंदे पॅनलने सुरुवातीपासूनच घेतलेली आघाडी अखेरपर्यंत कायम ठेवली. या आघाडीने विरोधकांपेक्षा दुप्पट मते घेऊन मतदारांचा कौल आपल्या बाजूने असल्याचे दाखवून दिले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ‘या’ तारखेला आमदारांसह पुन्हा गुवाहाटीला जाणार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ४० आमदारांसह पुन्हा गुवाहाटीला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. एका कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदेंनी गुवाहाटीला जाणार असल्याचं सांगितलं होतं. आता २० नोव्हेंबरला एकनाथ शिंदे सर्व आमदारांसह गुवाहाटीला जाणार आहेत. या दौऱ्यादरम्यान सर्व आमदार कामाख्या देवीचं दर्शन घेणार असल्याची माहिती मिळत आहे.एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांसह शिवसेनेत बंड केलं. मुंबईतून गेल्यावर तीन आठवड्यांच्या कार्यकाळात गुजरातनंतर एकनाथ शिंदेंसह सर्व बंडखोर आमदार गुवाहाटीला मुक्कामाला होते. येथे कामाख्या देवीच्या दर्शनाला जाताना सर्व बंडखोर आमदारांनी मोठं शक्तीप्रदर्शनही केलं. त्यानंतर महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार कोसळलं आणि सत्तांतर झालं.

श्रद्धाचा खून ‘लव्ह जिहाद’ प्रकरणातून? वडिलांनी व्यक्त केला संशय

वसईतील श्रद्धा वालकर तरुणीच्या हत्येने देशात खळबळ उडाली आहे. तिचा प्रियकर आफताब पूनवालाने श्रद्धाचा गळा दाबून खून केला. त्यानंतर तिच्या मृतदेहाचे ३५ तुकडे करुन फ्रीजमध्ये ठेवले होते. हे तुकडे दिल्लीतील मेहरोली परिसरात असलेल्या जंगलात फेकून दिले. श्रद्धा खून प्रकरणात नव नवीन माहिती समोर येत आहे. त्यात आता श्रध्दाच्या वडिलांनी या खूनामागे ‘लव्ह जिहाद’चा शंका व्यक्त केली आहे.याबाबत बोलताना श्रद्धाचे वडिल विकास वालकर म्हणाले, “या प्रकरणात मला लव्ह जिहादचा संशय येत आहे. दिल्ली पोलीस योग्य दिशेने तपास करतील, यावर माझा विश्वास आहे. श्रद्धा तिच्या काकांच्या संपर्कात होती, माझ्याशी ती बोलत नसे. तसेच, आफताबला फाशीची शिक्षा मिळावी,” अशी मागणी विकास वालकर यांनी केली आहे.

फडणवीसांच्या नागपुरातील उद्योगपतींचा देशात डंका, श्रीमंताच्या यादीत 6 जणांची नावं

नागपूर ही महाराष्ट्राची उपराजधानी आहे. तसेच नागपूरची देशात ओळख आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या निमित्ताने नागपूर देशात राजकीयदृष्ट्याही महत्त्वाचे स्थान आहे. आता याच नागपूरची ओळखमध्ये आणखी भर पडली आहे. देशातील सर्वात सर्वात 1036 श्रीमंत लोकांच्या यादीत नागपूर येथील 6 जणांचा समावेश झाला आहे.

देशपातळीवरील एका खासगी संस्थेच्या सर्वेक्षण केले. आतापर्यंत श्रीमंतांच्या यादीत दिल्ली, मुंबई, अहमदाबाद या शहरांचे प्राबल्य दिसून येत होते. मात्र, या यादीत नागपूरच्या उद्योगपतींचा समावेश झाल्याने शहराची मान उंचावली आहे. या सर्वेक्षणानुसार देशातील सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीत नागपूर हे कार्यक्षेत्र असलेल्या सहा उद्योगपतींचा समावेश करण्यात आला आहे.

SD Social Media

9850 60 3590

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.