600 पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये अभिनय करणारा अभिनेता शक्ती कपूर हा हिंदी चित्रपटांमध्ये सर्वात जास्त चर्चेत असलेला खलनायक आहे. शक्ती कपूरने त्याच्या फिल्मी करिअरमध्ये 80हून अधिक चित्रपटांमध्ये छेडछाड आणि रेप सीन केले आहेत. मात्र, हिंदी चित्रपटांमध्ये खलनायकाची भूमिका साकारणाऱ्या शक्ती कपूरने आता असे सीन्स करण्यास पूर्णपणे नकार दिला आहे.
शक्ती कपूर यांचा जन्म 3 सप्टेंबर 1952 रोजी दिल्लीतील एका पंजाबी कुटुंबात झाला. शक्ती कपूरचे खरे नाव सुनील सिकंदरलाल कपूर आहे. शक्तीला त्याचे नाव अजिबात आवडले नाही, यामुळे त्याने सुनील नाव बदलून शक्ती केले. शक्ती पंजाबी कुटुंबातील आहे, त्याने दिल्ली विद्यापीठाच्या करोरीमल कॉलेजमधून शिक्षण पूर्ण केले आहे.
शक्तीला ‘कुर्बानी’ चित्रपटातून ओळख मिळाली. आपल्या फिल्मी कारकिर्दीत अभिनेता बलात्काराच्या दृश्यांमुळे तो अधिक चर्चेत आला. असे म्हटले जाते की, एकदा शक्ती कपूर आपल्या आई-वडिलांना ‘इन्सानियत के दुश्मन’ चित्रपट दाखवण्यासाठी घेऊन गेले. चित्रपटातील त्याचा रेप सीन पाहून त्याची आई खूप रागावली. ती अगदी सिनेमागृहातून तत्काळ बाहेर आली. यानंतर शक्तीच्या वडिलांनी त्याला खूप फटकारले.
1982मध्ये दयानंद दिग्दर्शित ‘गुमसूम’ चित्रपटातील शक्ती कपूरचा बलात्कार रेप सीन चर्चेत आला होता. शक्तीने ‘मेरे आगोश में’ या चित्रपटातील सर्वात वादग्रस्त दृश्य दिले होते. हा सीन इतका वादग्रस्त होता की, सेन्सॉर बोर्डाने कित्येक महिने या चित्रपटाला मंजुरी दिली नव्हती.
2005 मध्ये एका वृत्तवाहिनीने स्टिंग ऑपरेशनचा व्हिडिओ जारी केला. ज्यामध्ये शक्ती कपूर एका टीव्ही शोमधील भूमिकेच्या बदल्यात एका मुलीचे लैंगिक शोषण करण्याचा प्रयत्न करताना कॅमेऱ्यात पकडला गेला. एवढेच नाही, तर शक्ती कपूर त्या मुलीला सांगताना आढळला की, इंडस्ट्रीमध्ये हे नेहमीच घडत आले आहे. आज ज्या सगळ्या मोठ्या अभिनेत्रींनी एव्हढी उंची गाठली आहे, त्या एवढ्या फेवर देऊनच तिथे पोहोचल्या आहेत.
2005मध्ये शक्तीचे स्टिंग ऑपरेशन समोर आल्यानंतर फिल्म आणि टेलिव्हिजन गिल्ड ऑफ इंडियाने त्याच्यावर बंदी घातली होती. मात्र, ही बंदीही एका आठवड्यानंतर मागे घेण्यात आली. शक्ती कपूरने एका मुलाखतीत सांगितले होते की, त्याची मुलगी श्रद्धा कपूर त्याच्या दारूच्या व्यसनामुळे त्याच्यावर रागावली होती. मुलीची नाराजी दूर करण्यासाठी त्याने दारू पिणे बंद केले होते.
शक्ती कपूर ‘बिग बॉस 5’ या रिअॅलिटी शोमध्ये सहभागी झाला होता. ‘बिग बॉस सीझन 5’मध्ये 13 स्पर्धकांमध्ये शक्ती हा एकमेव पुरुष स्पर्धक होता. शक्ती कपूरने अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरेची बहिण शिवांगी हिच्यासोबत प्रेमविवाह केला. शक्तीच्या ‘किस्मत’ या चित्रपटाच्या सेटवर त्याची शिवांगीशी भेट झाली. पहिल्याच भेटीत तो शिवांगीच्या प्रेमात पडला होता..