आजपासून राज्यात भाजपच्या नवनिर्वाचित केंद्रीय मंत्र्यांची जन आशीर्वाद यात्रा सुरू होत आहे. त्यासाठी हे मंत्री पदभार स्विकारल्यानंतर पहिल्यांदाच राज्यात येत आहेत. मुंबई विमानतळावर त्यांचे भव्य स्वागत करण्यात येणार आहे. चारपैकी खासदार कपील पाटील, डॅाक्टर भारती पवार, डॅाक्टर भागवत कऱ्हाड हे आजपासून या यात्रेस सुरूवात करत आहे.
केंद्रीय सुक्ष्म लघू उद्योग मंत्री नारायण राणे मात्र 19 ॲागस्टपासून मुंबईतून या यात्रेची सुरूवात करणार आहेत. 560 किमीचा प्रवास हे मंत्री या यात्रेतून करणार असून राज्यातील आगामी महापालिका निवडणुका लक्षात घेऊन ही यात्रा केली जात आहे. त्यात मराठवाडा, कोकण प्रांत पूर्णपणे पिंजून काढला जाणार आहे.
अशी असेल नारायण राणेंची जन आशीर्वाद यात्रा
19 आणि 20 ऑगस्ट असे दोन ही यात्रा मुंबईत असेल.
21 ऑगस्टला वसई- विरार
23 ऑगस्टला दक्षिण रायगड
24 ऑगस्टला चिपळूण
25 ऑगस्टला रत्नागिरी
26 ऑगस्टला सिंधुदुर्ग
19 ते 26 असा या जन आशीर्वाद यात्रेचा कालावधी असणार आहे. मुंबईहून सुरु होणाऱ्या या यात्रेचा सिंधुदुर्ग येथे समारोप होईल.