जागतिक कीर्तीचे चित्रकार रवी परांजपे यांचे निधन

जागतिक कीर्तीचे चित्रकार रवी परांजपे यांचं पुण्यात निधन झालंय. काही दिवस ते आजारी होते. पुण्यातील खासगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 87 वर्षांचे होते. भारतीय चित्रकला शैलीतील चित्रकार म्हणून त्यांची ओळख आहे. वास्तुशिल्पशास्त्र, प्रकाशन, जाहिरात या क्षेत्रात त्यांनी काम केले.जागतिक कीर्तीच्या नियतकालिकांमध्ये रवी परांजपे यांनी संशोधनपर लेखन केले.

परांजपे यांना ‘कम्युनिकेशन आर्ट्‌स गिल्ड हॉल ऑफ फेम’ हा जीवनगौरव पुरस्कार प्राप्त झाला असून त्यांच्या ‘द ग्रीन एकोज’ या निसर्गचित्राला 2012 मध्ये आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाला.

काही वर्षांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांच्या घरी भेट देऊन त्यांच्या कलाकृती पाहिल्या होत्या. पुण्यातील मॉडेल कॉलनी मध्ये त्यांचा परांजपे स्टुडिओ आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.