डास नसतील तर पर्यावरणाचा समतोल बिघडू शकतो

दरवर्षी लाखो लोकं डासांमुळे निर्माण होणाऱ्या आजारांमुळे त्रस्त असतात. त्यामुळे डास घरातून पळवून लावण्यासाठी अगरबत्ती, लिक्विड, स्प्रे, मच्छरदानी यांचा वापर केला जातो. पण हा तात्पुरता दिलासा असल्याने हे प्रयोग रोजच करावे लागतात. रात्री झोपताना जेव्हा डास आपल्याला चावतात किंवा आपल्या कानाजवळ गुणगुणतात, डासांचा नायनाट कसा करायचा? असा प्रश्न मनात येतो. पण तुम्ही कधी विचार केला आहे का?, की जगातील सर्व डास अचानक नाहीसे झाले तर काय होईल? या पृथ्वीवर परिणाम होईल? चला तर मग या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात.

डास ही कीटकांची एक प्रजाती आहे. डासांना उडणाऱ्या कीटकांच्या श्रेणीत ठेवण्यात आले आहे. डासांना फक्त २ पंख असतात. इतर प्राण्यांचे रक्त शोषून डास जगतात. जगात डासांच्या सुमारे 3500 प्रजाती आढळतात आणि एकमेकांपासून खूप वेगळ्या आहेत. काही डास रात्री जास्त सक्रिय असतात, तर काही डास दिवसा सक्रिय असतात. पण तुम्हाला माहित आहे का? फक्त मादी डास माणसांचे रक्त शोषते. कारण त्यातूनच ती अंडी घालू शकते.

नर डास जिवंत राहण्यासाठी फुलांचा रस शोषतात. मादी डास एखाद्या व्यक्तीला किंवा प्राण्याचे रक्त शोषून घेते. मादी डास गंभीर आजार असलेल्या व्यक्तीला चावली आणि नंतर दुसऱ्या व्यक्तीला चावली तर तेव्हा ती त्यातून विषाणू पसरवू शकते. परंतु या डासांच्या प्रजातींमध्ये अशा केवळ 40 प्रजातींमध्ये मादी आहेत ज्या अत्यंत धोकादायक आहेत. ज्यांच्या चावण्याने मलेरियासारखे घातक आजार होतात.

डासांच्या काही प्रजाती धोकादायक आहेत. अशा परिस्थितीत जर या प्रजाती नाहीशा झाल्या तर मानव निरोगी जीवन जगू शकतो. पण डासांच्या नायनाटाबद्दल बोलायचे झाले तर त्यामुळे पर्यावरण आणि पर्यावरणाचा समतोल बिघडू शकते.

डास खाणारे अनेक प्राणी आहेत. बेडूक, ड्रॅगन फ्लाय, मुंगी, कोळी, सरडे, वटवाघूळ इत्यादी प्राणी डास खातात. जर डास नाहीसे झाले तर या प्राण्यांना खायला खूप कमी अन्न मिळेल, ज्यामुळे त्यांचे अस्तित्व संपुष्टात येईल. डासांशिवाय परागण संपेल. परागीकरणाच्या प्रक्रियेत डास वनस्पतींचे परागकण वाहून नेतात आणि वेगवेगळ्या ठिकाणी टाकतात, ज्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी नवीन रोपे तयार होतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.