भारत आणि पाकिस्तानचा होणार सामना

भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही शेजारी देश आहेत. दोन्ही देशांतील क्रिकेट चाहत्यांना भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याची नेहमीच उत्सुकता असते. नुकतंच दोन्ही टीममध्ये टी-20 वर्ल्डकपमध्ये सामना रंगला. यावेळी पाकिस्तानने वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाला पहिल्यांदा पराभूत केलं. तर आता पुन्हा एकदा दोन्ही देश एकमेकांशी भिडणार आहेत.

BCCI ने या महिन्यापासून UAE मध्ये सुरु होणाऱ्या अंडर-19 आशिया चषक स्पर्धेसाठी 20 सदस्यीय भारतीय संघाची घोषणा केली आहे. याशिवाय, समितीने 11 ते 19 डिसेंबर दरम्यान बंगळुरूतील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत (NCA) खेळल्या जाणार्‍या 25 सदस्यीय संघाचीही घोषणा केली आहे.

पुढील वर्षी जानेवारी-फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या 19 वर्षांखालील वर्ल्डकप स्पर्धेच्या दृष्टीने या दोन्ही स्पर्धा अतिशय महत्त्वाच्या आहेत.

अंडर-19 आशिया चषक स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. 23 डिसेंबरपासून UAE मध्ये अंडर-19 आशिया कपचं आयोजन केलं जाईल. या आशिया चषक स्पर्धेत भारत, पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका, नेपाळ, अफगाणिस्तान, कुवेत आणि UAE हे संघ सहभागी होणार आहेत. ज्यामध्ये भारत आणि पाकिस्तानचे संघ पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानावर आमनेसामने दिसणार आहेत.

यश धुल याला भारतीय अंडर-19 संघाच्या कर्णधारपदी नियुक्त करण्यात आलं आहे. आशिया कपमध्ये भारताचा अंडर-19 संघ 25 डिसेंबरला पाकिस्तानच्या अंडर-19 संघाविरुद्ध सामना खेळणार आहे. दोन दिवसांनंतर, 27 डिसेंबरला संघ अफगाणिस्तानशी भिडणार आहे.

या स्पर्धेतील पहिला उपांत्य सामना 30 डिसेंबर रोजी होणार आहे. तर अंतिम सामना 1 जानेवारीला होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.