तुम्ही 90च्या दशकातील चित्रपट पाहत असाल, तर कदाचित तुम्ही ‘जुम्मा-चुम्मा दे दे’ हे गाणे नक्कीच पहिले असेल. या गाण्यावर अमिताभ बच्चन आणि किमी काटकरचा (Kimi Katkar) डान्सही तुम्हाला आठवत असेल. 11 डिसेंबर 1965 रोजी जन्मलेली किमी आज 56 वर्षांच्या झाल्या आहेत.
किमी काटकर यांनी सहाय्यक अभिनेत्री म्हणून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली होती. किमी यांनी जेव्हा फिल्मी दुनियेत पाऊल ठेवले तेव्हा त्या केवळ 20 वर्षांच्या होत्या. त्यांच्या अभिनयाची सुरुवात ‘पत्थर दिल’ या चित्रपटातून झाली होती, ज्यामध्ये त्या सहाय्यक अभिनेत्री होत्या. त्याच वर्षी किमीला ‘Adventures of Tarzan’ हा चित्रपट मिळाला.
किमी काटकरला त्यांच्या पदार्पणाच्या पहिल्याच वर्षी ‘अॅडव्हेंचर्स ऑफ टारझन’ हा चित्रपट मिळाला आणि याच काळात लोक त्यांना ‘टारझन गर्ल’ म्हणून ओळखू लागते. हा किमीचा पहिला मुख्य चित्रपट होता आणि चित्रपटातील अभिनेता हेमंत बिजरेला ‘इंडियन टारझन’ हे नाव मिळाले, तर अभिनेत्री किमी यांना त्यांच्या कामुक दृश्यांमुळे प्रसिद्धी मिळाली. हा चित्रपट खूप हिट झाला आणि लोकांना किमीची बोल्ड स्टाईल आवडली.
यानंतर किमी काटकरने ‘वर्दी’, ‘मर्द की जुबान’, ‘मेरा लहू’, ‘दरिया दिल’, ‘गैरकानूनी’, जैसी करनी वैसी भरनी, ‘शेरदिल’, ‘जुलम की हुकूमत’ अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केले, पण किमीला जी लोकप्रियता मिळाली ती ‘टारझन’ या चित्रपटातून! इतर कोणत्याही चित्रपटातून तितकी प्रसिद्धी मिळाली नाही. किमी अनेक वर्षांपर्यंत किमी ‘टारझन गर्ल’ म्हणून ओळखल्या जात होत्या. त्यानंतर एक चित्रपट आला, ज्याने किमी या नवीन यांना नवी ओळख मिळवून दिली.
1991 मध्ये आलेल्या ‘हम’ या चित्रपटात किमी काटकर अमिताभ बच्चन यांच्यासोबत झळकल्या होत्या. या चित्रपटात किमी आणि अमिताभ व्यतिरिक्त गोविंदा, रजनीकांत, अनुपम खेर, डॅनी डेन्झोम्पा यांच्या प्रमुख भूमिका होत्या. या चित्रपटातील ‘जुम्मा-चुम्मा’ हे गाणे इतके प्रसिद्ध झाले की, त्याच चित्रपटातील गाण्यासाठी किमीची आठवण काढली जाते. हा चित्रपट करत असताना अमिताभ 50 वर्षांचे होते आणि किमी 26 वर्षांच्या होत्या आणि दोघेही जोडी म्हणून हा चित्रपट करत होते.