मल्याळम चित्रपट दिग्दर्शक अली अकबर यांनी मुस्लीम (Muslim) धर्माचा त्याग करत असल्याची घोषणा केली आहे. सीडीएस जनरल बिपीन रावत यांच्या अपघाती मृत्यूनंतर मुस्लीम समाजातील काही व्यक्तींनी स्माईली इमोजीज सोशल मीडियावर पोस्ट केल्या होत्या. या कृत्यामुळं व्यथित होऊन अली अकबर आणि त्यांची पत्नी ल्युसायमा यांनी मुस्लीम धर्माचा त्याग करुन हिंदू धर्माचा स्वीकार करणार असल्याचं म्हटलं आहे. अली अकबर यांचं नवं नाव राम सिंग असणार आहे, असं वृत्त आहे.
अकबर अली यांनी मुस्लीम धर्मातील वरिष्ठ नेत्यांनी देखील अशा कृत्यांचा निषेध नोंदवलेला नाही. भारतीय संरक्षण दलाच्या शौर्यवान आणि वरिष्ठ अधिकाऱ्यासंदर्भातील अशा प्रतिक्रिया स्वीकारल्या जाऊ शकत नाहीत, असं अली अकबर म्हणाले. अली अकबर यांनी फेसबूकवर व्हिडीओ पोस्ट करुन यासंदर्भातील घोषणा केली आहे.
आज मी मला जन्मापासून मिळालेली ओळख फेकून देत आहे. आज पासून मी मुस्लीम नसून मी भारतीय आहे. भारताविरोधात स्माईली पोस्ट करणाऱ्या हजारो लोकांविरोधातील ही माझी प्रतिक्रिया असल्याचं अली अकबर म्हणाले आहे. अली अकबर यांनी देखील कमेंटसला प्रत्युत्तर देताना काही आक्षेपार्ह शब्द वापरले आहेत. त्यानंतर ती पोस्ट फेसबुकवरुन हटवली गेली मात्र ती व्हाटसअपवरुन शेअर करण्यात आली आहे.
इमोजी पोस्ट करणाऱ्यांवर कारवाई करावी
देशानं सीडीएस बिपीन रावत यांच्या निधनावर आनंद व्यक्त करुन त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी करणारी पोस्ट देखील केली आहे. या पोस्टवर देखील सोशल मीडियावर दोन गट पडलेले दिसून आले, काही जणांनी अली अकबरचं समर्थन केलं, तर काही जणांनी त्याच्या विरोधात कमेंट केल्या आहेत.