3 सेकंदात 50 फुटावरुन खाली कोसळलं स्काय स्विंग; लोक जमिनीवर आदळून उडाले

पंजाबमधील मोहाली येथे एका जत्रेत स्विंग जॉयराइड तुटल्याने लहान मुले आणि महिलांसह 10 लोक जखमी झाले आहेत. जखमींच्या डोक्याला आणि मानेला दुखापत झाली असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. फेज-9 येथील खासगी रुग्णालयातही पाच जणांना दाखल करण्यात आलं आहे. रविवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

सुमारे 50 फूट उंचीवर बसवलेला हा जॉयराईड आधी थोडासा झुकला आणि नंतर 3 सेकंदात खाली पडला. यावेळी जॉयराईडमध्ये बसलेल्या लोकांना अतिशय जोराचा झटका बसला, यामुळे अनेकजण जखमी झाले. अपघात होताच मैदानात एकच गोंधळ उडाला. यादरम्यान संतप्त जमावाने मेळाव्याचे व्यवस्थापन कर्मचारी आणि बाऊन्सरचा पाठलागही केला. त्यांनी घटनास्थळावरून पळ काढत स्वतःला वाचवलं. ही संपूर्ण घटना प्रत्यक्षदर्शींनी कॅमेऱ्यात कैद केली, ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

डीएसपी सिटी 2 एचएस बल यांनी सांगितलं की, जॉयराइडचा मालक जयपूरचा मुकेश शर्मा आहे. याप्रकरणी योग्य ती कारवाई केली जाईल. मोहालीचे डीसी अमित तलवार यांनी प्रसारमाध्यमांना सांगितलं की, प्रशासन या प्रकरणाची चौकशी करत असून लवकरच कारवाई केली जाईल. प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं की, 15 हून अधिक लोक जॉयराईडवर होते. जत्रेच्या ठिकाणी पुरेशा सुरक्षेच्या उपाययोजना नसल्याची तक्रार त्यांनी केली. अपघातग्रस्तांना रुग्णालयात नेण्यासाठी एकही रुग्णवाहिका घटनास्थळी उपस्थित नव्हती. नियमानुसार या ठिकाणी आजूबाजूला जाळपोळीच्या घटनेचा सामना करण्यासाठी अग्निशमन दलाच्या गाड्याही उपस्थित नव्हत्या.

फेज 6 सिव्हिल हॉस्पिटलमध्ये 3 पुरुष आणि 2 महिलांना दाखल करण्यात आल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. मान, पोट आणि पाठीला दुखापत झाल्याची तक्रार जखमींनी केली आहे. रेडिओलॉजिस्ट आणि ऑर्थोपेडिस्ट यांनी रुग्णांची तपासणी केली. आजकाल ट्रायसिटी चंदीगड, मोहाली आणि पंचकुला येथे आठवड्याच्या शेवटी मेळ्यांचे आयोजन केले जाते. या मेळ्यांमध्ये लहान मुले, महिला आणि तरुणांची मोठी गर्दी असते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.