महिला आयोगाच्या अध्यक्षपदी रुपाली चाकणकर यांची नियुक्ती

राज्यात वाढत्या महिला अत्याचाऱ्याच्या घटना वाढत आहेत. त्यातच राज्य महिला आयोगाचं अध्यक्षपद गेल्या दीड वर्षापासून रिक्त आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारला मोठया प्रमाणावर टीकेला सामोरं जावं लागत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती निश्चित मानली जात आहे.

राज्य सरकार याबाबत अधिकृत आदेश काढणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. रुपाली चाकणकर आपल्या आक्रमक भाषणशैलीने ओळखल्या जातात. चित्रा वाघ यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर रुपाली चाकणकर यांना राष्ट्रवादीच्या महिला प्रदेश अध्यक्षपदाची संधी मिळाली. रुपाली चाकणकर यांनी राज्यभरात राष्ट्रवादी महिला संघटन मंजबूत करण्यासाठी प्रयत्न केले आहेत. रुपाली चाकणकर यांच्या नियुक्तीबीबत महाविकास आघाडीतही एकमत झाल्याचं बोललं जात आहे.

फडणवीस सरकारच्या काळात विजया रहाटकर यांची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती. पण महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर त्यांनी महामंडळ आणि विविध शासकीय पदावरील नियुक्त्या रद्द केल्या. त्याचबरोबर महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचं पदही रिक्त झालं. यानंतर गेल्या काही महिन्यात राज्यात महिला अत्याचाराच्या घटना वाढल्याने राज्य सराकरवर टीका होत आहे. यामुळे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष नियुक्तीचा मुद्दाही पुढे आला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.