कलाविश्वाला गेल्या दोन वर्षांपासून मोठ्या संकटांचा सामना करावा लागत आहे. भारताच्या गानकोकिळा लता मंगेशकर यांच्या निधनानंतर बंगालच्या ज्येष्ठ गायिका संध्या मुखर्जी यांचं हृदय विकाराच्या झटक्याने निधन झालं आहे. त्या 90 वर्षांच्या होत्या… त्यांचं निधन झाल्याची माहिती रुग्णालयाने दिली. त्यांच्या निधनाने कलाविश्वाला मोठा धक्का बसला आहे.
संध्या मुखर्जी यांनी एस.डी.बर्मन, नौशाद आणि सलिल चौधरी यांसारख्या दिग्गज संगीत दिग्दर्शकांसोबत काम केलं होते. पण आता त्या फक्त त्यांच्या कलेतून आपल्यात जिवंत असणार आहेत.
गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती नाजूक होती. त्यामुळे संध्या मुखर्जी यांना जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात रुग्णायलात दाखल करण्यात आलं होतं.
मिळालेल्या माहितीनूसार, मंगळवारी जवळपास सातच्या दरम्यान त्यांना हृदय विकाराचा झटका आला. त्यानंतर त्यांचं निधन झालं. मुखर्जी यांना कोरोना व्हायरसची लागण देखील झाली होती.
एवढंच नाही त्यांना हृदया संबंधित अनेक आजार देखील होते. त्यांचे अवयव निकामी झाले होते. अखेर उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला..