गुजरातच्या विविध भागात मुसळधार पावसाने कहर सुरूच ठेवला आहे. औद्योगिक शहर सूरतमध्ये गेल्या 48 तासांत 15 इंचांपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. त्यामुळे अनेक भागात पाणी साचले होते. यानंतर बाधित भागातून लोकांना बोटीद्वारे बाहेर काढण्यात आले. हवामान विभागाने बुधवारी गुजरातमधील आठ जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट आणि सात जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी केला. दक्षिण गुजरातमधील तीन जिल्ह्यांमध्येही ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
सुरत जिल्ह्यात बचावकार्य सुरू असून लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. गेल्या 48 तासात 15 इंचाहून अधिक पावसाची नोंद झाली आहे.सुरत महानगरपालिकेचे आयुक्त म्हणाले की, बाधित भागातून पाणी काढण्यासाठी आम्ही एक डिवॉटरिंग पंप आणि 7 ट्रॅक्टर लावले आहेत.गुजरातच्या विविध भागात मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर हवामान खात्याने बुधवारी गुजरातच्या आठ जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट आणि सात जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी केला. दक्षिण गुजरातमधील तीन जिल्ह्यांमध्येही ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
काही आठवड्यांपूर्वी मेहसाणामध्ये काही तासांच्या पावसाने परिस्थिती बिकट झाली होती आणि रस्ते 2-3 फूट पाण्याने भरले होते. त्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.