काॕँग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव याचं निधन

कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार उद्योजक चंद्रकांत जाधव यांचे गुरुवारी निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर हैदराबाद मधील रुग्णालयात उपचार सुरु होते.

आज गुरुवारी त्यांची प्राणज्योत मालवली. दुपारी एक पर्यंत त्यांचे पार्थिव कोल्हापुरात आणण्यात येणार असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले. उद्योजक जाधव

यांचा कोल्हापूर शहरातील अनेक तालीम मंडळाशी फुटबॉललच्या माध्यमातून थेट संपर्क होता. त्याबरोबरच राजकीय व सामाजिक कार्यातून त्यांनी मोठा जनसंपर्क निर्माण केला होता. उद्योजक जाधव यांच्या निधनाबद्दल कोल्हापूर शहर व जिल्ह्यातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत जाधव यांनी काँग्रेसच्या चिन्हावर निवडणूक लढवून विजय प्राप्त केला होता. पहिल्यांदाच निवडणूक लढवून त्यांनी हे यश मिळवले होते.

मागच्या दीड वर्षात त्यांना दोन वेळा कोरोनाची लागण झाली होती. त्यातून ते ठणठणीत बरे झाले होते. मात्र काही दिवसांपूर्वी त्यांना पुन्हा त्रास होऊ लागल्याने हैदराबाद येथील रुग्णालयात दाखल केले होते. मात्र उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले.

आमदार जाधव यांना पोटात इन्फेक्शन झाले होते. हैदराबाद मधील रुग्णालयात त्यांच्यावर सोमवारी मोठी शस्त्रक्रिया झाली होती. शस्त्रक्रिया यशस्वी झाली, परंतु शस्त्रक्रियेनंतर त्यांची प्रकृती उपचाराला साथ देत नव्हती. त्यातच आमदार चंद्रकांत जाधव यांची निधन झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.