आज दि.१ डिसेंबर च्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा…

ममता बॅनर्जी यांनी दिले
भाजपाविरोधी राष्ट्रीय आघाडीचे संकेत

ममता बॅनर्जींनी मुंबईच्या वाय. बी. चव्हाण सेंटरमध्ये विविध क्षेत्रातल्या मान्यवरांशी संवाद साधला. या चर्चेमध्ये बोलताना भाजपाविरोधी राष्ट्रीय आघाडीचे त्यांनी संकेत दिले आहेत. वाय. बी. सेंटरमध्ये ममता बॅनर्जी यांनी घेतलेल्या चर्चेमध्ये स्वरा भास्कर, शत्रुघ्न सिन्हा, महेश भट, मुकुल रोहतगी, मेधा पाटकर, रिचा चड्डा, तुषार गांधी, विद्या चव्हाण आदी मान्यवरांचा समावेश होता. या चर्चेदरम्यान राजकीय मुद्द्यांवर बोलताना ममता बॅनर्जी यांनी भाजपाच्या पराभवाचा फॉर्म्युला सांगतानाच भाजपाविरोधी आघाडीचेही अप्रत्यक्षपणे संकेत दिले.

कल्याण डोंबिवलीत सापडले
नायजेरियाचे सहा प्रवासी

दक्षिण आफ्रिकेतून आलेला प्रवासी करोनाग्रस्त असल्याचं आढळल्यानंतर कल्याण डोंबिवली महापालिकेचा आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. आरोग्य विभागाने इतर देशांमधून आलेल्या नागरिकांचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. यावेळी नायजेरिया मधून आलेले सहा प्रवासी सापडले असून या प्रवाशांची आरटीपीसीआर चाचणी करुन नमुने तपासण्यासाठी पाठवण्यात आले आहेत अशी माहिती पालिकेच्या डॉक्टर प्रतिभा पानपाटील यांनी दिली आहे.

मुंबई, ठाणे, पुणे आणि सातारा काही
ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यात

मुंबई, पुणे आणि कोणक किनारपट्टीच्या अनेक भागांमध्ये बुधवार सकाळपासूनच पावसाची संततधार सुरु आहे. मुंबई मुख्य शहरांबरोबरच उपनगरांमध्येही सकाळपासूनच ढगाळ वातावरण असून पावसाची रिपरिप सुरु आहे. हवामान खात्याकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार दुपारच्या सुमारास रायगड, पालघर, मुंबई, ठाणे, पुणे आणि सातारा जिल्ह्यामधील काही ठिकाणी सौम्य स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यात आहे. सकाळी ११ च्या सुमारास हा इशारा देण्यात आला, तो पुढील 2 दिवस देण्यात आलाय.

अवकाळी पावसामुळे पिकांना
मोठा फटका शेतकऱ्यांचे नुकसान

कधी अवकाळी पाऊस तर कधी ढगाळ वातावरणामुळे शेतकऱ्याला सतत संकटाला सामोरे जावं लागत आहे. आता अवकाळी पावसाने शेतकऱ्यांना पुन्हा एकदा रडवलं आहे. वातावरणातील बदलाचा फटका यंदा सर्वच हंगामातील पिकांना बसलेला आहे. आता खरीप-रब्बी हंगामानंतर फळबागांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ लागलं आहे. पिकं आणि फळबागा अंतिम टप्प्यात असतानाच अवकाळी पावसाचा आणि बदलत्या वातावरणाचा परिणाम झाला आहे. खरिपातही सोयाबीन, तुर, कापूस या पिकांचे नुकसान पावसामुळेच झाले होते. तर आता रब्बी हंगामावरही पावसाचा आणि ढगाळ वातावरणाचा परिणाम होत आहे.

दिल्लीमध्ये पेट्रोलच्या किमती
थेट ८ रुपये प्रतिलिटर झाल्या कमी

एकीकडे देशभरात पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे सामान्यांचं आर्थिक गणित कोलमडलं असताना राजधानी दिल्लीमध्ये मात्र आज पेट्रोलच्या किमती थेट ८ रुपये प्रतिलिटर इतक्या कमी झाल्या. त्यामुळे देशभरातील नागरिकांना जरी पेट्रोलच्या शंभरीपार गेलेल्या दरांचा फटका सहन करावा लागत असला, तरी दिल्लीकर मात्र दिल्ली सरकारच्या एका निर्णयामुळे खूश झाले आहेत. इतर राज्यातील जनता देखील त्या त्या राज्य सरकारने अशाच प्रकारचा निर्णय घ्यावा, अशी मागणी करू लागली आहे.

सेंट्रल इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड
कंपनीच्या विक्रीला मंजूरी

केंद्र सरकारने सरकारी मालकीच्या सेंट्रल इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड या कंपनीच्या विक्रीला मंजूरी दिलीय. ही कंपनी आता नंदल फायनान्स अॅण्ड लिजींग या कंपनीला २१० कोटींना विकण्यात येणार आहे. यंदाच्या आर्थिक वर्षामधील ही दुसरी सरकारी कंपनी आहे जिच्या विक्रीला केंद्राने हिरवा कंदील दिलाय. काही आठवड्यांपूर्वीच सरकारने टाटा समुहासोबत एअर इंडियाच्या विक्रीचा करार केला होता. याच आर्थिक वर्षामध्ये सेंट्रल इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडचा व्यवहार पूर्ण करण्याचा केंद्र सरकारचा मानस आहे.

नवा विषाणू पाहिल्यावर मला
धक्काच बसला : रकेल वियाना

करोनाचा हा नवा विषाणू नेमका कसा आणि कुठे सापडला याबद्दल खुलासा झाला आहे. रॉयटर्सला दिलेल्या मुलाखतीत दक्षिण अफ्रिकेतील शास्त्रज्ञांनी याबद्दल महत्वाची माहिती दिली असून आपल्याला धक्का बसल्याचं म्हटलं आहे. त्यांनी सांगितलं. “मी जे पाहत होती ते पाहिल्यानंतर मला धक्काच बसला होता. प्रक्रियेत काही चूक तर नाही झाली ना असा प्रश्नही मी उपस्थित केला होता,” अशी माहिती रकेल वियाना यांनी दिली आहे. रकेल वियाना दक्षिण अफ्रिकेतील लॅन्सेट लॅबमध्ये कार्यरत आहेत.

कौशल्य शिक्षणासाठी
इन्फोसिस कंपनी सोबत करार

राज्यातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना कौशल्यआधारित शिक्षण मिळावे आणि त्यांची रोजगारक्षमता वाढावी यासाठी उच्च व तंत्रशिक्षण विभागाने ‘इन्फोसिस’ कंपनीसोबत सामंजस्य करार केला आहे. उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी उच्च व तंत्रशिक्षण विभाग आणि इन्फोसिस कंपनी यांच्यात झालेल्या सामंजस्य कराराची माहिती दिली. इन्फोसिसच्या सामाजिक उत्तरदायित्व अंतर्गत विविध विषयांवरील आणि विविध कालावधीचे ३,९०० हून अधिक ऑनलाइन अभ्यासक्रम तयार केले असून ते कंपनीच्या ऑनलाइन मंचावर उपलब्ध आहेत.

येत्या शनिवारी ४ डिसेंबर रोजी
यावर्षातील शेवटचे खग्रास सूर्यग्रहण

येत्या शनिवारी ४ डिसेंबर रोजी कार्तिक अमावास्येच्या दिवशी यावर्षातील शेवटचे खग्रास सूर्यग्रहण होणार आहे. परंतू हे सूर्यग्रहण भारतातून दिसणार नसल्याचे पंचांगकर्ते, खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी सांगितले. खग्रास सूर्यग्रहण जेथे दिसेल तेथे जप, तपश्चर्या, उपासना-पाठ, दान-दानाचे सूतक इत्यादी कल्पना असतील, इतर देशांमध्ये होणार नाहीत.

SD social media
9850 60 3590

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.