राज्यपालांना काहीही कळत नाही, नुसतेच बरळत राहतात : राज ठाकरे

मनसेला 16 सोळा वर्षे पूर्ण झाली आहेत. मनसेच्या वर्धापन दिनानिमित्त राज ठाकरेंनी तब्बल दोन वर्षांनंतर त्यांच्या खास शैलीत धडाडीने भाषण केलं. त्यावेळी त्यांनी नेत्यांचा तर समाचार घेतलाच, मात्र यावेळी त्यांनी राज्यपालांनाही सोडलं नाही. राज्यपालांची नक्कल करत छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल राज्यपालांनी केलेल्या वक्तव्याचार राज ठाकरेंनी समाचार घेतला आहे. हे महाराष्ट्रातले राजकीय पक्ष तुम्हाला जातीत गुंतवून ठेवत आहेत. शिवाजी असं नुसतं नाव ऐकू आलं की हा माणूस उठून जायचा, काहीतरी सापडेल या आशेने, असे म्हणत हे परवा आमचे राज्यपाल. काहीसमज बिमज आहे का ? मी जेव्हा पहिल्यांदा भेटायला गेलो, बघितलं ना कसंय ते? असे म्हणत थोड मागे झुकत, वाकडं होत राज ठाकरेंनी राज्यपालांची हुबेहुब नक्कल केली. त्यानंतर त्याच शैलीत राज्यपालांचा समाचार घेतला आहे.

राज्यपालांशी पहिल्या भेटीबाबत सांगताना राज ठाकरे म्हणाले, पहिल्यांदा जेव्हा भेटायला गेलो तेव्हा वाटलं की माझा हात बघायला लागतील की आप का मंगल कहा पै है..? तुम्हाला काही माहितीये का? महापुरुषांबद्दल माहितीये का? आपला अभ्यास, संबंध नसताना नुसतं बोलून जायचं. रामदास स्वामींनी काय लिहीलेय, छत्रपतींनी काय लिहीलंय ते माझ्या घरात लावलंय मी. शिवछत्रपतींबद्दल जे लिहिलंय शिवछत्रपतींबद्दल इतकं चांगलं लिहिलेलं मी वाचलेलं नाही. वाचा ते निश्चयाचा महामेरू…कोण श्रीमंतयोगी…असे म्हणत त्यांनी राज्यपालांचा समाचार घेतालाय. तसेच आमच्याकडे योगी सापडतच नाही. धाड पडली ना ईडीची की कळतं श्रीमंती, अशी कोपरखिळीही त्यांनी मारली आहे.

आमच्याच महापुरुषांना बदनाम करायचं आणि माती फिरवून मतं मिळवायची. एवढाच उद्योग सुरु आहे. परवादिवशी भाषणात कुणीतरी मला दाखवलं, जोतिबा आणि सावित्राबाईंबद्दल बोलतो, नक्कल करुन दाखवतो. अहो तेव्हा व्हायची लग्न.. तुमचं अजून नाही झालं. सालं नको तिथं बोटं घालायची सवय यांना, असे म्हणत राज्यपालांच्या त्याही वक्तव्याचा समाचार घेतला आहे. यानंतर कोंबड्या लागल्या झुंजायला, मग आता दोन दिवसांनंतर कळलं, निवडणुका होत नाही, मग सगळे पुन्हा शांत, असे म्हणत त्यांनी राजकीय पक्षांचाही समाचार घेतला आहे. तसेच निवडणुका लांबणीवर पडणार हे नोव्हेंबरपासून सांगत होतो. मला वाटत नाही निवडणुका मार्चमध्ये होतील. मी काही पत्रकारांशीही बोललो होतो, निवडणूक आली ना की ती चढायला लागते. आता बरोबर कळला तुम्हाला निवडणुकीचा अर्थ, साला चढायला लागते म्हणजे काय? तर अशी ती स्पर्श करते. वातावरणात निवडणूक यायला लागते. मला वातावरणात निवडणूकच दिसेना, असेही ते म्हणाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.