रशिया-युक्रेन वादासह पाच राज्यांच्या विधानसभांच्या एक्झिट पोलचे सकारात्मक पडसाद शेअर बाजारावर उमटले. रिलायन्स इंडस्ट्री सहित प्रमुख स्टॉक्समध्ये तेजी नोंदविली गेली. कालप्रमाणेच शेअर बाजार तेजीसह बंद झाला. आज प्रमुख निर्देशांकात 2 टक्क्यांहून अधिक वाढ नोंदविली गेली. बुधवारच्या ट्रेडिंगमध्ये सेन्सेक्स 1223 अंकांच्या वाढीसह 54,647 वर आणि निफ्टी 332 अंकांच्या वाढीसह 16345 वर पोहोचला. शेअर बाजारात मेटल (Metal) सेक्टर वगळता अन्य सेक्टर इंडेक्स मध्ये तेजी नोंदविली गेली. सर्वाधिक वाढ मीडिया आणि रिटेल सेक्टरमध्ये दिसून आली. रशिया-युक्रेन संकटाचं निवळणार वातावरण व आंतरराष्ट्रीय वाढीव तेल किंमतीचा भारतीय अर्थव्यवस्थेवर कोणताही परिणाम दिसत नसल्याने बाजारात शेअर खरेदीचा ओघ वाढल्याचा अंदाज जाणकरांनी वर्तविला आहे.
वधारलेले शेअर्स
• एशियन पेंट्स (5.56%)
• रिलायन्स ( 5.31%)
• बजाज फायनान्स (5.04%)
• एम अँड एम (4.88%)
• इंड्सइंड बँक (4.12%)श्री सिमेंट (-2.74%)
• ओएनजीसी (-2.07%)
• पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन (-2.00%)
• एनटीपीसी (-1.68%)
• कोल इंडिया (-1.32%)
शेअर बाजारातील तेजीचं मुख्य कारण रशिया-युक्रेन संकटातील तणाव कमी होणे मानलं जातं. ज्यामुळे सध्या शेअर बाजारात नीच्यांकी स्तरावर पोहोचलेल्या स्टॉक्सच्या खरेदीकडे कल वाढलेला दिसून येत आहे. यूरोपात तेल तुटवड्याच्या संकटामुळे डिझेल मध्ये मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे. त्यामुळे रिलायन्स इंडस्ट्रीज स्टॉक्स मोठ्या प्रमाणात तेजी नोंदविली गेली. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या स्टॉक्समध्ये 5 टक्क्यांहून अधिक तेजी नोंदविली गेली. पाच राज्यांच्या विधानसभेचे एक्झिट पोल भाजपला अनुकूल असल्याचं चित्र आहे. त्यामुळे गुंतवणुकदारांत धोरण स्थिरतेबाबत अनुकूल वातावरण निर्माण झालं आहे.