अर्धवट राष्ट्रगीत गायल्याने ममता बॕनर्जींविरोधात पोलिसात तक्रार

मुंबई दौऱ्यावर असलेल्या तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. ममता यांच्यावर मुंबईत पत्रकार परिषदेदरम्यान राष्ट्रगीताचा अपमान केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

मुंबई भाजपा नेत्यांनी ममता यांच्याविरोधात एफआयआर दाखल करणार असल्याचं म्हटलं आहे. याप्रकरणी भाजपा नेत्याने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. ममता यांनी बसून राष्ट्रगीत गायले आणि ते पूर्ण न करता २-४ ओळी गायल्या नंतर बंद केले, असा आरोप भाजपा नेत्यांनी केला आहे. ममता बॅनर्जी बुधवारी मुंबई दौऱ्यावर होत्या.

“ममता बॅनर्जी यांनी या राष्ट्रगीताचा अवमान केला आहे. आपल्या देशाचा अवमान करण्याचे काम ममता बॅनर्जी यांनी केले आहे. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची आवश्यकता आहे. केंद्र सरकारने राष्ट्रगीताच्या संदर्भात जो काही कायदा आहे त्यानुसार गुन्हा दाखल करण्याची आवश्यकता आहे. कारण राष्ट्राभिमान महत्त्वाचा आहे. राष्ट्रगीत महत्त्वाचे आहे आणि त्याविषयी ममता बॅनर्जी इतक्या निष्काळजी असतील तर हे चुकीचे आहे. राजकारण यांना देशहितापेक्षा मोठे वाटत आहे. या सर्वांमध्ये त्यांनी राष्ट्रगीताला दुय्यम स्थान दिले आहे. याची शिक्षा देशाने आणि आपल्या राज्याने त्यांना दिली पाहिजे. पोलिसांनी ममता बॅनर्जींवर गुन्हा दाखल करावा,” अशी प्रतिक्रिया प्रविण दरेकर यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.