अंधेरी पोटनिवडणुकीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि बाळासाहेबांची शिवसेना यांच्यामध्ये शीतयुद्ध पेटले आहे. ‘निवडणुका घरात बसून किंवा ऑनलाईन होत नाही. होईल तर समोरासमोर पण होईल, असं म्हणत पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांनी थेट शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना आव्हान दिले आहे. तसंच, गिरीश महाजन यांनी यापुढे शांतपणे बोलावं, असा सल्लाही पाटील यांनी दिला.
जळगावमध्ये पत्रकारांशी बोलत असताना गुलाबराव पाटील यांनी गिरीश महाजन यांची व्हायरल ऑडिओ क्लिप प्रकरणामध्ये जोरदार पाठराखण केली.
‘गिरीश महाजन यांची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे, त्यावर मंत्री गुलाबराव पाटील यांना विचारले असता, त्यांनी मंत्री गिरीश महाजनांच्या बाजूने प्रतिक्रिया दिली आहे. प्रत्येक वेळी आपण मुडमध्ये राहू असे नसते ना., लोकप्रतिनिधी हा सुद्धा एक माणूस असतो, महाजनांनी सांगितल की, फाईल रद्द केली असेल, तर समोरच्या ऐकणाऱ्याला गिरीश महाजन जोरात बोलले असे वाटले असेल, गिरीश भाऊंना विनंती करू की, यापुढे शांत बोला, असंही मंत्री गुलाबराव पाटील यावेळी बोलतांना सांगितले.