जगात सर्वाधिक वापरला जाणारं मेसेज अॕप म्हणजे व्हाॕट्सअॕप . भारतात देखील व्हॉट्सअॕप वापरणाऱ्यांची संख्या अधिक आहे.
व्हॉट्सअॕपने या वर्षी ऑक्टोबर महिन्यात 20 लाखापेक्षा अधिक भारतीयांचे खाते निलंबित केले आहे. मेसेजिंग सेवा अॕपने दिलेल्या रिपोर्टमध्ये ही माहिती दिली आहे. आपल्या रिपोर्टमध्ये कंपनी म्हणाली की, आम्ही 20 लाख 69 हजार भारतीयांचे खाते निलंबित केले आहे.
या रिपोर्टमध्ये पुढे म्हटले की, भारतीय खात्याची ओळख +91 या क्रमांकाने होती. व्हॉट्सअॕप एन्ड टू एन्ड एन्क्रिप्टेज मेसेजिंग सेवामध्ये चूकीची भाषा वापरण्यास बंधन घालण्यासाठी हे पाऊल उचलले आहे. आयटी नियम 2021 चे पालन करत कंपनीने आपला पाचवा मासिक अहवाल जाहीर केला आहे. अहवाल जारी करताना कंपनीचे प्रवक्ता म्हणाले की, या अहवालात व्हॉट्सअॕपकडे आलेल्या तक्रारी, केलेल्या कारवाईची माहिती दिली आहे.
सोशल मीडियातील दिग्गज कंपनी मेटाने ऑक्टोबर महिन्यात भारतातील 1.88 कोटीहून अधिक पोस्टवर कारवाई केली आहे. एकूण 13 श्रेणींमधील नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल ही कारवाई करण्यात आली आहे. कंपनीने आपल्या मासिक अहवालात नमूद केल्याप्रमाणे, फेसबुकच्या मालकीच्या इन्स्टाग्रामने ऑक्टोबर महिन्यात 12 श्रेणीतील नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी 30 लाखाहून अधिक पोस्टवर कारवाई केली आहे.