सामान्यतः पाली आपल्या सर्वांच्या घरांमध्ये दिसतात. घरांमध्ये पाली दिसण्याकडे आपण दुर्लक्ष करतो आणि काही लोक घाबरून त्यांना घराबाहेर काढतात. वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये काही जीव दिसणे हे शुभ तर काही जीव दिसणे अशुभ संकेत मानले जातात. त्याचप्रमाणे घरामध्ये पाल दिसणे हे आर्थिक लाभाचे लक्षण आहे, असेही मानले जाते. पण कधी-कधी या पाली आपल्याला आपल्या भविष्यात घडणाऱ्या घटनांबद्दल संकेतही देतात. भोपाळचे ज्योतिषी आणि पंडित हितेंद्र कुमार शर्मा याबद्दल सांगत आहेत.
वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये पाली दिसणे शुभ लक्षण आहे. असे मानले जाते की, दिवाळीच्या दिवशी जर तुम्हाला घरामध्ये पाल दिसली तर ते तुमच्यासाठी खूप शुभ असू शकते. याशिवाय जर तुम्ही नवीन घरात शिफ्ट होत असाल आणि घरात पाल दिसली तर ते तुमच्या पूर्वजांच्या आगमनाचे किंवा पूर्वज तुमच्यासोबत असल्याचे लक्षण मानले जाते.
जर तुम्हाला तुमच्या घरात मेलेली पाल किंवा मातीत मरून पडलेली पाल दिसली तर ते तुमच्यासाठी अशुभ लक्षण आहे. याशिवाय तुमच्या घरात 2 पेक्षा जास्त पाली एकमेकांशी भांडताना दिसल्या तर समजावे की, घरातील एखाद्या व्यक्तीच्या बाबतीत काही वाईट घडू शकतं.
असे मानले जाते की, जर तुम्हाला स्वप्नात दोन पाली भांडताना दिसल्या तर ते तुमच्या घरातील परस्पर मतभेद होण्याचे संकेत असतात. एवढेच नाही तर जर स्वप्नात तुम्ही पाल पकडण्याचा प्रयत्न करत असाल आणि तो घाबरून तुमच्यापासून दूर पळताना दिसत असेल तर ते तुमच्यासाठी शुभ संकेत आहे. असे स्वप्न पाहिल्यावर लवकरच तुम्हाला चांगली बातमी मिळेल, असे मानले जाते.
जर तुम्हाला तुमच्या घराच्या मंदिरात किंवा मंदिराच्या आजूबाजूला सरडा दिसला तर तो तुमच्यासाठी शुभ असू शकतो. सरडा हे देवी लक्ष्मीचेही प्रतीक मानले जाते. असे मानले जाते की एखाद्या मंदिराजवळ किंवा मंदिरात सरडा दिसणे हे लक्षण आहे की तुमचे घर नेहमी संपत्तीने भरलेले असेल आणि तुमच्या उत्पन्नाचे स्रोत वाढतील.
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. Sdnewsonline त्याची हमी देत नाही.)