शिवसेनेत उभी फुट पडल्यानंतर दोन गट झाले. यामुळे ठाकरे गट आणि शिंदे गटाकडून राज्यातील प्रत्येक भागात दौरे करून कार्यकर्त्यांची जुळवाजुळव करण्याचे काम सुरू आहे. दरम्यान मागच्या चार महिन्यांपासून राज्यातील राजकीय घडामोडींमुळे शिंदे गट आणि ठाकरे गट नेहमी आमनेसामने आलेला पहायला मिळाला. यामध्ये काही नेते नाराज होत ठाकरे गटाला रामराम केला तर काही एकनिष्ठ राहत ठाकरे गटाच्या वाढीसाठी प्रयत्न करत आहेत. दरम्यान ठाकरे गटाचे माजी खासदार चंद्रकांत खैरे हे उद्धव ठाकरेंसोबत राहून शिंदे गटावर जोरदार प्रहार करताना दिसतात. परंतु त्यांना काल भाषणाची संधी न मिळाल्याची जोरदार चर्चा रंगली आहे.
चंद्रकांत खैरे औरंगाबाद विभागाचे नेतृत्व करतात. मागच्या काही दिवसांपासून शिंदे गटाकडून चंद्रकांत खैरे यांच्यावर शिंदे गटाकडून जोरदार प्रहार करण्यात येत आहे. परंतु खैरे यांनी शिंदे गटावर वांरवार पलटवार करत असल्याने नेहमी चर्चेत राहिले आहेत.
औरंगाबादमध्ये महाप्रबोधन यात्रा सुरू असल्याने यावेळी सुषमा अंधारे यांच्या भाषणानंतर खैरे भाषणाला उभे राहताच लोक निघाल्याने त्यांनी नतमस्तक होत सगळ्यांचे आभार मानले.
शिवसेनेचे वरिष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांनी भाषण सुरू करण्याअगोदरच सभेतील लोक खुर्च्यांवरून उठले त्यामुळे चंद्रकांत खैरे यांना भाषण करण्याची संधीच मिळाली नाही. मात्र यावेळी खैरे यांनी जनतेसमोर नतमस्तक होत जनतेचे आभार मानले.