पत्नीच्या नावावर घर खरेदी कराल तर मिळतील अनेक फायदे ; टॕक्स मध्येही मिळेल सूट

घर खरेदी करताना अनेकजण त्याची नोंदणी महिलांच्या नावाने करण्याला प्राधान्य देतात. कारण, महिलांच्या नावावर घर खरेदी केल्यास अनेक फायदे मिळतात. त्यामुळे सरकारी योजनांचा लाभ आणि करातून सूटही मिळते.आयकरात महिलांना कायमच मोठी सूट मिळते. त्यामुळे महिलांना मिळणाऱ्या उत्पन्नाचा एक मोठा भाग करमुक्त असतो. अशावेळी महिलांच्या नावाने घर खरेदी केल्यास आयकरात मोठी सूट मिळू शकते.

याशिवाय, तुम्ही घर खरेदी करण्यासाठी गृहकर्ज काढत असाल तर महिलांसाठी तुलनेने कमी व्याजदर असतो. भारतीय स्टेट बँकेत महिलांना गृहकर्जावर इतरांपेक्षा 0.5 टक्के कमी व्याजदर आहे. तसेच घर खरेदी करताना त्याची नोंदणी महिलेच्या नावाने झाली तर स्टॅम्प ड्युटीत बरीच सूट मिळते.

महिलांना घरे खरेदी करण्यास प्रोत्साहित करण्यासाठी पंतप्रधान आवास योजनेतून राज्यस्तरावर अनेक प्रकारच्या सवलती दिल्या जातात. प्रधानमंत्री आवास योजनेच्या (पीएमएवाय) लोअर इनकम ग्रुप (एलआयजी) किंवा इकोनॉमिक विकर सेक्शन कॅटेगरी (ईडब्ल्यूएस) अंतर्गत अनुदान घेण्याकरीता घरातील एका महिलेला मालकी देणे बंधनकारक आहे.

SBI कडून 75 व्या स्वातंत्र्यदिनी होम लोनवर विशेष ऑफर

त्याच वेळी जर तुम्हाला एसबीआयच्या योनो सेवेअंतर्गत गृहकर्ज घ्यायचे असेल, तरीही तुम्हाला 5 बीपीएस व्याज सवलतीचा लाभ मिळेल. एसबीआय होम लोन व्याजदर 6.70 टक्के आहे. एसबीआय आपल्या ग्राहकांना 6.70 टक्के व्याजदराने 30 लाख रुपयांपर्यंतचे गृहकर्ज देत आहे. 30 लाख ते 75 लाखांपर्यंतच्या गृहकर्जावर 6.95 टक्के व्याजदर असेल. 75 लाखांवरील गृहकर्जावरील व्याजदर फक्त 7.05 टक्के असेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.