अफगाणिस्तानमध्ये परिस्थिती पुन्हा बदलली आहे. अफगाणिस्तानमधील जास्तहून अधिक जागांवर तालिबाननं कब्जा केला आहे. अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अशरफ गनी देश सोडून गेलेत. काही नागरिक अफगाणिस्तान सोडून भारतात आलेत.
काबूल इंटरनॅशनल एयरपोर्टवर आता कमर्शियल फ्लाइट्सची उड्डाण थांबवण्यात आलीत. विमानतळावर गोळीबार होत आहे. मोठ्या संख्येनं नागरिक देश सोडण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र आता विमानांची उड्डाण थांबवण्यात आल्यानं नागरिक आतमध्येच अडकून बसले आहेत.
अफगाणिस्तानला पुन्हा इस्लामिक इमिरेट्स ऑफ अफगाणिस्तान (आयइए) जाहीर करण्याची तयारी तालिबानने सुरु केली आहे. तालिबानने काबूलवर ताबा मिळवण्यास सुरुवात करत असताना नागरिकांनी पलायन करण्यासाठी विमानतळावर गर्दी केली. रविवारी संध्याकाळपासून नागरिकांची गर्दी पाहायला मिळत आहे. आज सकाळी सुद्धा हजारो नागरिकांची गर्दी विमानतळावर आहे.