तामिळनाडूतील कुन्नूर येथे भारतीय वायू दलाचे हेलिकॉप्टर कोसळले. एएनआयच्या वृत्तानुसार या हेलिकॉप्टरमध्ये चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपिन रावत देखील उपस्थित होते. याशिवाय त्यांचे कुटुंबीयही हेलिकॉप्टरमध्ये होते. हेलिकॉप्टरमधील प्रवाशांना वाचवण्याचे काम सुरू आहे. यामध्ये १४ जण प्रवास करतो होते, त्यापैकी ३ जणांना वाचवण्यात यश आले आहे. माहितीनुसार बिपिन रावत एका व्याख्यानमालेत सहभागी होणार होते.
तामिळनाडूच्याएएनआयच्या वृत्तानुसार, तामिळनाडूत कोईम्बतूर आणि सुलूरदरम्यान कुन्नूर येथे भारतीय वायू दलाचे हेलिकॉप्टर कोसळून दुर्घटना झाली. लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह संरक्षण दलाचे प्रमुख जनरल बिपिन रावत आणि अन्य अधिकारी या Mi- 17V5 हेलिकॉप्टरमधून प्रवास करत होते. हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झाल्यानंतर त्याला आग लागली. घटनास्थळी बचावकार्य सुरु करण्यात आले. मात्र अपघात झालेलं ठिकाण डोंगराळ भागामध्ये असल्याने तिथे पोहचण्यास अडचणी येत होत्या.
स्थानिक लष्करी अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत. त्यांना मिळालेल्या माहितीनुसार स्थानिकांनी ८० टक्के भाजलेले दोन मृतदेह स्थानिक रुग्णालयात नेले. दरम्यान, हेलिकॉप्टर अपघातात १४ पैकी ११ जणांचा मृत्यू झाला आहे.
तामिळनाडूतील कोईम्बतूर आणि सुलूर येथे कोसळलेल्या लष्करी हेलिकॉप्टरमध्ये १४ जण होते. त्यात सीडीएस जनरल बिपिन रावत, त्यांची पत्नी मधुलिका रावत, ब्रिगेडियर एलएस लिडर, लेफ्टनंट कर्नल हरजिंदर सिंग, एनके गुरसेवक सिंग, एनके जितेंद्र केआर, एल/नाईक विवेक कुमार, एल/नाईक बी साई तेजा आणि हवालदार सतपाल यांचा समावेश होता.