आज आहे गुरुपुष्यामृत योग; या राशींना मिळणार फळ

आज  गुरुवार दिनांक  28 ऑक्टोबर 2021.  आज चंद्र कर्क राशीतून भ्रमण करणार असून आज सकाळी  नऊ वाजून एक्केचाळीस मिनिटांनी गुरू पुष्य  योग सुरू होणार आहे. हा अमृत योग असून या दिवशी  सोने खरेदी करण्याची प्रथा आहे. अत्यंत शुभ अश्या या योगावर आध्यात्मिक साधना फलद्रुप होते.  आता पाहूया बारा राशींचे भविष्य.

मेष

आज चंद्र उच्चीचा असून तुम्हाला उत्तम गृहसौख्य देईल. घरात शुभता येईल. घर सजावट, साफसफाई यात दिवस जाईल. उत्तर खरेदी कराल . शुभ दिवस.

वृषभ

आज तृतीय चंद्र  आहे, प्रवास  घडेल. काही महत्त्वाचे  संपर्क होतील. तुमच्या चांगल्या कामाची प्रशंसा होईल.  सुवर्ण खरेदी  करणे शुभ राहील. दिवस  आनंदात घालवा.

मिथुन

आज धन स्थानातील ग्रह  कुठूनतरी आर्थिक लाभ मिळवुन देणार आहेत. कुटुंब सुख  मिळेल. कुटुंबीयांना हवा तसा वेळ द्याल कुटुंबियांसाठी खरेदी कराल. दिवस शुभ आहे.

कर्क

राशी च्या चतुर्थ स्थानात रवि मंगळ आहेत. जपून रहा.  आईची काळजी घ्या. राशीतील उच्च चंद्र अणि  पंचम शुक्र शुभ फल देईल.  प्रवास किंवा आर्थिक लाभ संभवतात. दिवस उत्तम.

सिंह

आज चंद्र बाराव्या स्थानात असून काही नुकसान होण्याची शक्यता आहे. खर्चात वाढ होईल. धार्मिक बाबींसाठी खर्च संभवतो. मुले खुश राहतील. दिवस मध्यम आहे.

कन्या

आज दिवस मित्र मैत्रिणींसोबत  ,कुटुंबा सोबत मजा करण्याचा आहे.  लाभ होतील. नवीन खरेदी होईल. प्रकृती साथ देईल. तुमच्या चांगल्या कामाची प्रशंसा होईल. दिवस शुभ आहे.

तुला

आज शनिवार असूनही अचानक काम आले तरी करावे लागेल. त्यासाठी काही नियोजन करून ठेवा. घरी देखील वेळ द्या.  मंगळ रवि तेजस्वी व्यक्तिमत्त्व बहाल करतील.  दिवस बरा जाईल.

वृश्चिक

चंद्राच्या भाग्य स्थानातील शुभ  प्रभावात असलेल्या वृश्चिक व्यक्तींना आज   आनंदी राहण्याचा संकेत आहे. परोपकार, हाती घेतलेल्या कामात यश  आणि प्रशंसा मिळेल.  दिवस शुभ आहे.

धनु

आज अष्टमात आलेला चंद्र शारीरिक त्रास दर्शवतो. घरी  आरामात रहा. वाहन चालवणे टाळा. आर्थिक नुकसान संभवते.  एकूण मिश्र फळ देणारा दिवस आहे.

मकर

सप्तम चंद्र, शनिच्या प्रतियोगात आहे. थोडी नकारात्मक मानसिकता होईल. धार्मिक कार्य घडेल. कौटुंबिक सुख मिळेल. आर्थिक स्थिती ठीक. दिवस चांगला.

कुंभ

आज दिवसभर  थकवा वाटेल. आराम करा. कोणाशी बोलाचाली करू नका. शत्रू निर्माण होतील. आर्थिक व्यवहार टाळा. उपासनेत वेळ घालवा.  दिवस  मध्यम जाईल

मीन

आज दिवस मुलांच्या मागण्या, पुरवण्यात जाणार आहे.  अध्यात्मिक साधना  होईल. वाचन किंवा अभ्यास उत्तम होईल. दिवस आनंदात घालवा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.