ईडीची आता कल्याण-डोंबिवलीमध्ये एण्ट्री, तब्बल 65 जण रडारवर!

आतापर्यंत बड्या नेत्यांना जेलमध्ये टाकणाऱ्या ईडीची कल्याण-डोंबिवलीमध्ये एण्ट्री झाली आहे. ईडीने केडीएमसीच्या आयुक्तांना पत्र लिहून 65 प्रकरणांची माहिती मागितली आहे. डोंबिवलीतील 65 विकासकांनी कल्याण-डोंबिवली महापालिका आणि रेराची बनावट कागदपत्र तयार केली आणि फसवणूक केली, असा आरोप आहे.

बनावट कागदपत्रांच्या माध्यमातून बेकायदेशीर बांधकामं झाल्याचंही ईडीने त्यांच्या पत्रात म्हणलं आहे. याप्रकरणी तातडीने कागदपत्र सादर करावीत, असं ईडीने आयुक्तांना सांगितलं आहे.

कल्याण-डोंबिवली पालिकेच्या बनावट बांधकाम परवानग्या तयार करून त्याआधारे महारेरा प्राधिकरणाची नोंदणी प्रमाणपत्र बेकायदा इमारतींना मिळवून पालिका, महसूल विभाग आणि शासनाची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या डोंबिवलीतल्या 65 बांधकामांप्रकरणी ईडीने चौकशीला सुरूवात केली आहे, त्यामुळे खळबळ उडाली आहे.केडीएमसीने 65 विकासकांच्या विरोधात मानपाडा आणि रामनगर पोलीस स्टेशनमध्ये दाखल केलेल्या एफआयआरच्या प्रती तातडीने उपलब्ध करून देण्यात याव्यात, अशी मागणी ईडीने पत्राद्वारे केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.