गेल्या काही दिवसासून कांद्याचे भाव स्थिर झालेले आहेत. मनमाड उत्पन्न बाजार समितीत लाल आणि उन्हाळ कांद्याचे भाव एक हजार रूपये क्विंटल आहेत. कांद्याची आवकही बऱ्यापैकी आहे. परंतु भाव नसल्याने कांदा उत्पादक आर्थिकदृष्ट्या हैराण झाले आहेत.
मनमाड बाजार आवारात लाल आणि उन्हाळ कांद्याची ४९१ ट्रॅक्टर इतकी आवक झाली. लाल कांदा ६०० ते ११३०, सरासरी १००० हजार रूपये तर उन्हाळ कांद्याला ६५० ते १०६२, सरासरी ९५० रूपये क्विंटल असे भाव होते. मध्यंतरी खरीप हंगामातील लाल कांद्याची आवक घटल्याने दर तीन हजारापर्यंत गेले होते. परंतु नंतर उशिराच्या खरीपातील लाल कांदा येऊ लागला. त्याची आवक अद्याप टिकून आहे. त्यात उन्हाळची आवक सुरू झाली. देशांतर्गत मागणी कमी झाल्यामुळे दरात घसरण झाल्याचे सांगितले जाते. कांदा दरातील घसरणीमुळे शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता आहे.