विरोधी पक्षनेते पद तरी पाच वर्षे टिकून राहील का ?

भाजपकडे आता कार्यकर्त्यांची अत्यंत कमतरता आहे. कार्यकर्त्यांना भाजपमध्ये न्याय मिळत नसल्याने अनेकजण महाविकास आघाडीची वाट धरत आहे. हे चित्र पाहता देवेंद्र फडणवीस यांचे विरोधी पक्षनेते पद तरी पाच वर्षे टिकून राहील का ? असा प्रश्न जयंत पाटील यांनी उपस्थित केला.

मंगळवेढा मतदारसंघातील निवडणूक प्रचाराच्या जाहीर सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी भाजप आणि फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. भाजपने पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात ५ वर्षे पक्षीय राजकारण केले. भारतनाना भालके काँग्रेसचे आमदार होते म्हणून भाजपने त्यांच्या २४ गावांच्या पाण्याच्या मागणीकडे दुर्लक्ष केले. आणि आज फडणवीस इथे येऊन भाजपला मत द्या सांगत आहेत. मी पंतप्रधान मोदी यांच्याकडून पैसे आणतो. अहो मोदींनी महाराष्ट्राच्या हक्काचा जीएसटीचा परतावा अद्याप दिला नाही तर इतर मागण्या काय मान्य करतील ? असा खोचक टोला जयंत पाटील यांनी लगावला. भाजप प्रचार करताना सांगतंय की आम्हाला भारत नानांबद्दल आदर आहे. भाजपला भारत नानांबद्दल आदर आहे तर मग ही निवडणूकच का होत आहे ? असा सवाल करतानाच मंगळवेढा-पंढरपूरची जनता सूज्ञ आहे. ते नक्कीच निवडणुकीच्या निकालाच्या माध्यमातून भाजपला योग्य उत्तर देतील असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.