मंदिरा बेदी आपल्या फिटनेससाठी नेहमीच ओळखली जाते. या वयात देखील तिचा फिटनेस एखाद्या तरूणीला लाजवेल असाच आहे. मंदिराच्या वडीलांचे नाव वीरेंद्र सिंह बेदी आणि आईचे नाव गीता बेदी होते. किंग अंकल या सिनेमात ती बालकलाकाराच्या रुपात झळकली होती. ९० च्या दशकात ‘शांती’ टीव्ही मालिकेतून मंदिराने या झगमगत्या दुनियेत पदार्पण केलं होतं. या कौटूंबिक मालिकेत मंदिराने आपल्या हक्कांसाठी लढणा-या मुलीची भूमिका साकारली होती. या शोनंतर मंदिरा घराघरात शांतीच्या नावाने प्रसिध्द झाली. यानंतर मंदिराने ‘औरत’ आणि ‘क्योकि सास भी कभी बहू थी’ सारख्या मालिकांमध्ये काम केले. या सोबतच मंदिराने आतापर्यंत ‘दुश्मन’, ‘सीआईडी’, ‘फेम गुरुकुल’, ‘डील या नो डील’ , ‘फियर फैक्टर’, ‘पंजाबी चक दे’, ‘जो जीता वही सुपरस्टार’, ‘इंडियन आइडल जुन्यीयर’, ‘गैंग्स ऑफ हसेपुर’, ‘आई कैन डू दैट’ आणि ‘इंडियाज डैडलिएस्ट रोड’ यांसारख्या शोजमध्ये काम केलेय. पूजाने काही निवडक तेलगू सिनेमांमध्ये अभिनय केला आहे. दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे या चित्रपटात छोटीशी भूमिका केल्याबद्दल ती अधिक प्रसिद्ध झाली. मंदिराने आतापर्यंत’दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’, ‘बादल’, ‘शादी के लड्डू’, ‘बाली’, ‘डायवोर्स’, ‘मैट्रिमोनी’, ‘मीराबाई नॉट आउट’, ‘ओ तेरी’व ‘वोदका डायरी’ यांसारख्या चित्रपटात काम केलेय.२००३ क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत तिने पहिली महिला समालोचक होण्याचा मान मिळवला. त्यांच्या समालोचना ऐवजी क्रिकेटच्या अज्ञानावरुन व समालोचना दरम्यानच्या तिच्या वेषभूशेमुळे त्या जास्त चर्चिली गेली. मंदिरा काही क्रिकेट एक्सपर्ट नाही. तिला क्रिकेटमधलं काहीही न कळणं हाच तर यूएसपी होता! चारू शर्मासह मंदिरा बेदी अँकर म्हणून दाखल झाल्यावर सुरुवातीला जुन्या जाणत्यांनी नाकं मुरडली होती. पण नंतर प्रत्यक्ष मॅचपेक्षा एक्स्ट्रॉ इनिंगचा टीआरपी वाढू लागला. मंदिरा बेदी यांच्या न्यूडल स्ट्रॅप्ड, बॅकलेस ब्लाऊजेस, झिरझिरीत साड्या हा चर्चेचा विषय ठरला. २०१४ मध्ये फॅशन डिझाईनिंगमध्ये ‘सॉल्ट’या ब्रँडच्या माध्यमातून पदापर्ण केलेल्या मंदिराने साड्यांचे रिडिझाईनिंग केले आहे. मंदिराने १९९९ साली दिग्दर्शक राज कौशल याच्याशी लग्न केलं होतं. मंदिरा आणि राज कौशल यांना एक मुलगा असून त्याचं नाव वीर असं आहे.
संजीव वेलणकर,पुणे