करोनाची दुसरी लाट सर्वत्र सरली असून त्याचा मोठा फटका महाराष्ट्राला बसला आहे. राज्यात सलग दोन दिवस रुग्ण संख्येने २० हजाराचा टप्पा गाठला आहे. सुरूवातीला दिवसाला ४ ते ५ हजाराच्या सरासरीने रुग्ण आढळून येत होते. मार्च मध्यापर्यंत महाराष्ट्रात २० ते २४ हजारांच्या सरासरीने दररोज रुग्ण आढळून येत आहे.
राज्यात २५ हजार ८३३ नवीन करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. करोनाचा राज्यात शिरकाव झाल्यापासून पहिल्यांदाच इतक्या मोठ्या संख्येनं रुग्ण आढळून आले आहेत. चोवीस तासांत तब्बल २५ हजार ८३३ लोकांना करोनाची लागण झाली असून ५८ जणांचा मृत्यू झाला, तर १२ हजार १७४ जणांनी या आजारावर मात केली. २४ तासांत नागपूरमध्ये सर्वाधिक ४५२३ नवीन रुग्णांचे निदान झाले. मुंबईत २८७७, पुण्यात २७९१, औरंगाबादला एक हजार २७४, पिंपरी-चिंचवड १२७२ नागरिकांना लागण झाली.
उपाय योजना तरीही
राज्यात आजपर्यंत एकूण २१,७५,५६५ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट ) ९०.७९ % एवढे झाले आहे. मुंबई, पुणे, नागपूर या महत्त्वाच्या शहरांसह राज्यातील इतरही शहरात करोनाचा उद्रेक झाला आहे. राज्यातील निम्म्यापेक्षा अधिक शहरांमध्ये नाईट कर्फ्यू, अंशतः लॉकडाउन आणि कडक लॉकडाउन आदी उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत.