चोपडा तालुक्यातील कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी उपविभागीय दंडाधिकारी सुमित शिंदे यांनी चोपडा तालुका क्षेत्रात 20 मार्च 2021 रोजी पहाटे 1 वाजल्यापासून 21 मार्च 2021 रोजी रात्री 12 पर्यंत सर्व बाजारपेठा, आठवडी बाजार व दुकाने बंद ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.
या कालावधीत सर्व बाजारपेठा, आठवडी बाजार बंद राहतील, किराणे दुकाने, अत्यावश्यक नसलेली सर्व दुकाने बंद राहतील. किरकोळ भाजीपाला, फळे खरेदी विक्री केंद्रे बंद राहतील. शैक्षणिक संस्था, शाळा, महाविद्यालये, खाजगी कार्यालये बंद राहतील. हॉटेल, रेस्टॉरंट बंद राहतील.
वरीलप्रमाणे लागु करण्यात आलेल्या निर्बंधातुन दुध विक्री केंद्र, वैद्यकीय उपचार व सेवा, मेडिकल स्टोअर्स, रुग्णवाहिका सेवा, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागातील अधिकारी कर्मचारी, आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधीत घटक यांना सुट देण्यात आली आहे. तसेच 20 व 21 मार्च 2021 रोजी पुर्वनियोजीत असलेल्या परिक्षा व महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पूर्व परीक्षेचे परिक्षार्थी व परिक्षेकरीता नेमण्यात आलेल्या अधिकारी -कर्मचारी यांना वर नमूद निर्बंधातुन सुट राहील.