राज्यात पुढील चार दिवस पावसाची शक्यता हवामान विभागले व्यक्त केली आहे. हवेची चक्राकार स्थिती निर्माण झाल्याने सध्या पूर्वमोसमी पावसाला पोषक स्थिती आहे. मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्यासह गारपीट होण्याचा इशारा देण्यात आला आहे.
मराठवाड्यात १९ ते २२ मार्च दरम्यान पाऊस राहणार आहे. मध्य महाराष्ट्रात १९ ते २१ मार्च या कालावधीत तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटात पावसाची शक्यता असून, कोकणात २१ आणि २२ मार्चला काही भागांत पावसाचा अंदाज आहे. २२ मार्चपासून उत्तरेकडील राज्यांत पावसाला अनुकूल स्थिती असेल. पुढील दोन दिवस मराठवाडा आणि विदर्भात सोसाट्याच्या वाऱ्यासह गारपीट होण्याचा इशारा देण्यात आला आहे.
या ठिकाणी पावसाची शक्यता
हवामान विभागाच्या अंदाजानुसार १९ ते २२ मार्च या कालावधीत औरंगाबाद, जालना, परभणी, पुणे, नगर, धुळे, नंदुरबार, जळगाव, बीडर्, हिंगोली, नागपूर, अकोला, अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया, वर्धा, बुलढाणा, २१ आणि २२ मार्चला रायगड, रत्नागिरीर्, सिंधुदुर्ग, नाशिक, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर आदी ठिकाणी पावसाची शक्यता आहे.