मुंबईकर सूर्यकुमार यादवला संधी
भारत आणि इंग्लंड यांच्यात तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी टीम इंडियाच्या खेळाडूंची घोषणा करण्यात आली आहे. विराट कोहलीकडे संघाचे कर्णधारपद आहे. मुंबईकर फलंदाज सूर्यकुमार यादवला एकदिवसीय संघात संधी देण्यात आली आहे. 23 मार्चपासून ही मालिका खेळली जाणार आहे.
इंग्लंडविरोधातील चौथ्या टी-20 सामन्यात खेळण्याची संधी मिळाल्यानंतर सूर्यकुमारने अर्धशतक साजरे करत सर्वांना आपली नोंद घेण्यास भाग पाडले. विजय हजारे स्पर्धेत धावांची बरसात करणाऱ्या पृथ्वी शॉला मात्र या संघातून वगळण्यात आले आहे. आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी केलेला गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाला भारतीय संघात संधी देण्यात आली आहे. मालिकेतील सर्व सामने पुण्यात खेळवले जाणार असल्याचे सांगण्यात आले.
एकदिवसीय मालिकेचे वेळापत्रक – 23 मार्च – पहिला सामना, 26 मार्च – दुसरा सामना, 28 मार्च – तिसरा सामना
भारतीय संघेतील खेळाडू : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, शुबमन गिल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), केएल राहुल (यष्टीरक्षक), यजुर्वेंद्र चहल, कुलदीप यादव, क्रुणाल पंड्या, वॉशिंग्टन सुंदर, टी. नटराजन, भुवनेश्वर कुमार, मो. सिराज, प्रसिद्ध कृष्णा, शार्दुल ठाकूर.