मराठा क्रांती मोर्चाबद्दल कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. त्यामुळे व्यथित होऊन मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक रमेश केरे यांनी दोन दिवसांपूर्वी फेसबुक लाईव्ह करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. अखेरीस या प्रकरणी सात जणांसह इतरांवर गुन्हे दाखल झाले आहे. या प्रकरणाची ऑडिओ क्लिपही 3 वर्षांपूर्वीची असून त्यात छेडछाड झाल्याचा आरोप केला आहे.
मराठा क्रांती ठोक मोर्चा प्रमुख रमेश केरे यांनी 16 ऑक्टोबर रोजी आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यांच्यावर मुंबईतील जेजे रुग्णालयात उपचार सुरू आहे. या प्रकरणी आता MRA मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
रमेश केरे हे मराठा क्रांती मोर्चासाठी मोठा निधी गोळा करून अपहार केल्याची बदनामी केल्याचा आरोप करण्यात आला होता. रमेश केरे यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. कथित ऑडिओ क्लिपही 3 वर्षांपूर्वी झालेल्या फोन संभाषणाची आहे. या क्लिपमध्ये आर्थिक व्यवहारांचा उल्लेख आहे. मात्र,ही क्लिप मोडतोड केलेली आहे, असा आरोप रमेश केरे यांनी तक्रारीत केला आहे.