क्रिकेटच्या इतिहासातील चार अविश्वनीय विक्रम,..

क्रिकेट मध्ये विक्रम हे मोडण्यासाठीच बनलेले असतात, हे तुम्ही बर्‍याचदा ऐकले असेल. परंतु काही असे विक्रम आहेत ज्यांना मोडणे हे खरोखरच अशक्य असल्यासारखेच आहे. मग ते ऑस्ट्रेलियन दिग्गज फलंदाज डॉन ब्रॅडमन यांची 99ची फलंदाजीची सरासरी असो किंवा वेस्ट इंडीजचे ब्रायन लारा यांची 400 धावांची कसोटी खेळी असो. आपण या लेखात बघणार आहोत असेच चार विक्रम ज्यांना मोडणे हे काही प्रमाणात तरी अशक्यच आहे.

1)वनडे इतिहासातील सर्वोत्कृष्ट गोलंदाजी-
वनडे क्रिकेटमध्ये गोलंदाजाला गोलंदाजी करण्यासाठी 10 षटके म्हणजेच 60 चेंडू मिळतात,आणि संघाला फलंदाजीसाठी 50 षटके. परंतु एका सामन्यात झिम्बाब्वेचा संघ केवळ 15.4 षटकांत बाद झाला होता. श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज चमिंडा वासने 2001 साली झालेल्या वनडे सामन्यात झिम्बाब्वे विरुद्ध अशीच भेदक गोलंदाजी केली होती.

चामिंडा वासने या सामन्यात तब्बल 8 गडी बाद केले होते. वासने या सामन्यात 8 षटके गोलंदाजी करत केवळ 19 धावा खर्च केल्या होत्या. त्याचा हा विक्रम मोडणे जवळजवळ अशक्यच असणार आहे.

2)डावात सर्वाधिक 588 चेंडू फेकण्याचा विक्रम-
साल 1957 मध्ये एजबॅस्टन येथे झालेल्या कसोटी सामन्यात वेस्ट इंडीजचे गोलंदाज सनी रामदीन यांनी हा ऐतिहासिक विक्रम प्रस्थापित केला होता. त्यांनी इंग्लंडच्या दुसऱ्या डावात 98 षटके म्हणजेच 588 चेंडू फेकले होते. या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियाचे टीआर वीवर्स यांचा क्रमांक येतो. वीवर्स यांनी 1964 साली इंग्लंड विरुद्धच 95.1 षटके म्हणजेच 571 चेंडू फेकले होते.

3)वनडे क्रिकेटमधील सर्वात कमी इकॉनॉमी रेट-
वेस्ट इंडिजचे गोलंदाज फिल सिमन्स यांची कसोटी कारकीर्दीत अपेक्षेनुसार यशस्वी ठरली नाही, पण वनडे क्रिकेटमध्ये त्यांनी शानदार कामगिरी केली. विशेष म्हणजे 1992 मध्ये पाकिस्तानविरुद्धच्या वनडे सामन्यात त्यांनी 10 षटकांच्या गोलंदाजीत 8 षटके निर्धाव टाकली होती. वनडे क्रिकेट इतिहासातील ही सर्वात इकॉनोमिकल गोलंदाजी आहे. यादरम्यान सिमन्स यांचा इकॉनोमी रेट केवळ 0.30 होता

4)सर्वाधिक आंतरराष्ट्रीय विकेट-
श्रीलंकेचे महान गोलंदाज मुथय्या मुरलीधरन यांच्या नावे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी मिळविण्याचा विक्रम आहे. त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण 1347 बळी घेतले आहेत. यात कसोटी क्रिकेटमध्ये 800 बळी घेतलेले असून, वनडे सामन्यात त्यांनी 547 बळी मिळवलेले आहेत. या यादीत ऑस्ट्रेलियाचे शेन वॉर्न मुरलीधरननंतर दुसर्‍या क्रमांकावर आहेत. पण मुरली व वॉर्न यांच्यामधील अंतर हे तब्बल 346 बळींचे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.