मोदी सरकारची नवी योजना,
प्रत्येक भारतीयांकडे असणार युनिक हेल्थ आयडी
पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील आठवड्यात एक मोठी योजना सुरू करणार आहेत. यामध्ये प्रत्येक भारतीयाला एक युनिक हेल्थ आयडी मिळेल. पीएम नरेंद्र मोदी 27 सप्टेंबरला पंतप्रधान डिजिटल आरोग्य मिशन सुरू करणार आहेत. केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी ही माहिती दिली आहे. युनिक हेल्थ आयडीमध्ये त्या व्यक्तीचे संपूर्ण आरोग्य रेकॉर्ड असेल.
डोंबिवली हादरले, 14 वर्षीय अल्पवयीन
मुलीवर 30 जणांचा बलात्कार
डोंबिवलीत एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. डोंबिवली पूर्वेला मानपाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत हा सर्व प्रकार घडला. पोलिसांनी याप्रकरणी आरोपींविरोधात पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पीडित मुलगी १४ वर्षांची अल्पवयीन आहे. आरोपींचा शोध सध्या सुरु आहे. बुधवारी सकाळी हा सगळा प्रकार उघडकीस आला. डोंबिवलीच्या भोपर परिसरात ही घटना घडली आहे. १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तब्बल ३० आरोपींनी सामूहिक बलात्कार केला. २२ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
पेगॅसस प्रकरण चौकशीसाठी
तज्ज्ञ समिती स्थापन करणार
पेगॅसस प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एक तज्ज्ञ समिती स्थापन केली जाईल, असं सर्वोच्च न्यायालयाने जाहीर केलं आहे. याबाबतचा आदेश पुढील आठवड्यात जारी केला जाईल. सरन्यायाधीश एन.व्ही रमण प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान म्हणाले की, “आम्हाला येत्या आठवड्यात याबाबतचा आदेश जारी करायचा आहे. आम्ही एक तज्ज्ञ समिती तयार करत आहेत, परंतु काही सदस्यांनी वैयक्तिक कारणांमुळे ह्यात सामील होण्यास नकार दिला आहे. त्यामुळे हे प्रकरण लांबणीवर पडत आहे.” सरन्यायाधीश एन.व्ही रमण यांनी वरिष्ठ वकील सीयू सिंह यांना हे सांगितलं आहे.
पाकिस्तानमध्ये चीनी नागरिकांची
संख्या ५० लाखांच्यावर
एकीकडे भारताचे चीन आणि पाकिस्तानची गेल्या अनेक वर्षांपासून तणावपूर्ण संबंध असताना चीन आणि पाकिस्तान यांची जवळीक मात्र दिवसेंदिवस वाढतच आहे. इतकेच नव्हे तर चीन सर्व क्षेत्रात पाकिस्तानला मदत करण्यात पुढाकार घेत आहे. यासाठी चिनी सैनिक, तंत्रज्ञ, डॉक्टर, अभियंते यांच्यासह विविध क्षेत्रातील चीनी नागरिक हे मित्र देश पाकिस्तानमध्ये सातत्याने राहत आहेत. ही संख्या येत्या ४ वर्षात ५० लाखांच्यावर जाईल, असा अंदाज आहे.
कोविशील्डच्या दोन डोसमधील
अंतर कमी होऊ शकते
कोरोना प्रतिबंधित लशींमधील कोविशील्डच्या दोन डोसमधील अंतर कमी होऊ शकते, असा दावा अनेक माध्यमांच्या वृत्तांतून करण्यात आला होता. केंद्र सरकारने आता त्यावर उत्तर दिले आहे. कोविशील्ड लशीच्या दोन डोसमधील अंतर कमी करण्याबाबत सध्या कोणत्याच प्रकारे विचार करण्यात आलेला नाही, अशी माहिती सरकारच्या एका मोठ्या तज्ज्ञाने दिली. तसेच नियमांमध्ये संशोधन करणे आवश्यक होते, असेही त्यांनी सांगितले.
अमरिंदर सिंग म्हणाले, काँग्रेसच्या
नेतृत्वाला अनुभवाचा अभाव
पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग म्हणाले की, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी वाड्रा यांना अनुभव नसल्याने सल्लागार चुकीचा सल्ला देऊन त्यांची दिशाभूल करत आहेत. तसेच सिंग हे राजीनाम्याबाबत खुलासा करताना म्हणाले की, तीन आठवड्यांपूर्वी सोनिया गांधी यांनी राजीनामा मला देण्याची आज्ञा दिली होती, परंतु नवजत सिंह सिद्धूला पंजाबचे मुख्यमंत्री बनण्यापासून रोखण्याचे सांगितले होते, त्यांचे मुख्यमंत्री होणे पंजाबसाठी धोकादायक ठरेल. असे अनेकांचे मत होते. काँग्रेस नेते के.सी. वेणुगोपाल, अजय माकन आणि रणदीप सुरजेवाला यांच्यावरही टीका केली.
संपूर्ण देशातील वातावरण
प्रदूषित : WHO
WHO ने वायू प्रदूषणाबाबत नवीन स्तर पातळी जाहिर केली आहे. WHO ने २००५ मध्ये वायू प्रदूषणाबाबतचे विविध स्तर हे निश्चित केले होते. 16 वर्षानंतर WHO ने हवेतील गुणवत्तेबाबत, प्रदूषणाबाबत नवीन स्तर जाहिर केले आहेत. सुरुवातीला PM 2.5 (particulate matter) या प्रदुषकाचा हवेतील मधील एका क्बुविक मीटरमागे 25 मायक्रोग्रॅम्स हा स्तर सुरक्षित समजला जायचा. बदललेल्या स्तरानुसार 15 मायक्रोग्रॅम्स हा स्तर सुद्धा सुरक्षित नसल्याचं WHO ने जाहिर केलं आहे. त्यानुसार संपूर्ण देशातील वातावरण प्रदूषणाच्या पातळीवर असल्याचा WHO चे म्हणणे आहे.
आखाडा परिषदेचे नरेंद्र गिरी यांचा
मृत्यू गुदमरून झाल्याचा रिपोर्ट
मृत्यूचं कारण शोधण्यासाठी पोलिसांकडून पोस्टमॉर्टम करण्यात आलं. या पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट समोर आला असून फास घेतल्याने गुदमरुन मृत्यू झाल्याचं सांगण्यात आलं आहे. अ. भा. आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी यांच्या मृत्यूमुळे सध्या खळबळ उडाली आहे.
फ्लिपकार्ट एक्स्ट्राद्वारे देणार
4,000 पार्ट-टाइम जॉब
वॉलमार्टच्या मालकीची ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टने (Flipkart) बुधवारी सांगितले की, ते एक स्वतंत्र मार्केटप्लेस मॉडेल ‘फ्लिपकार्ट एक्सट्रा’ (Flipkart Xtra) सादर करत आहेत. जेणेकरून इनडिव्हिज्युअल, सेवा संस्था आणि तंत्रज्ञांना कमाईच्या संधी उपलब्ध होऊ शकतील. ‘फ्लिपकार्ट एक्स्ट्रा’ अॕप गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे. याद्वारे फ्लिपकार्ट इच्छुक व्यक्तींना एक सोपा अनुभव प्रदान करेल.
महापालिकांच्या निवडणुकीत
3 सदस्यीय प्रभाग पद्धत असेल
ठाकरे सरकारनं महानगरपालिकांसाठी मोठा निर्णय घेतलाय. मुंबई वगळता इतर सर्व महापालिकांच्या निवडणुकीत 3 सदस्यीय प्रभाग पद्धत असेल तर मुंबईत एक वॉर्ड पद्धत असेल. नगरपालिका आणि नगरपरिषदेत मात्र 2 सदस्यीय प्रभाग पद्धत असेल. नगरपंचायतीलाही 1 सदस्यीय पद्धत असेल. गेल्या काही काळापासून वॉर्ड तसच प्रभाग पद्धतीवर मोठं राजकारण सुरु आहे. त्याच पार्श्वभूमीवर आजच्या कॅबिनेट बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. याबाबतचा अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना देण्यात आला आहे.
मुंबई ते सिंधुदुर्ग विमान सेवा
9 ऑक्टोबरपासून सुरू करणार
एअरलाईन्स कंपनी अलायन्स एअर 9 ऑक्टोबरपासून मुंबई ते सिंधुदुर्ग उड्डाण सुरू करणार आहे. अलायन्स एअर ही एअर इंडियाची प्रादेशिक उड्डाण उपकंपनी आहे. एअर इंडिया लवकरच एका खाजगी कंपनीच्या ताब्यात देण्यात येणार आहे. त्याची तयारी सुरू आहे. अलायन्स एअरने सांगितले की ते 9 ऑक्टोबरपासून मुंबई ते सिंधुदुर्ग उड्डाणे सुरू करणार आहे. सिंधुदुर्ग विमानतळाचे काम नुकतेच पूर्ण झाले आहे. अलायन्स एअर या मार्गावर दररोज थेट हवाई सेवा सुरू करेल.
संरक्षण दलाच्या प्रमुखपदी
महाराष्ट्राचे सुपुत्र व्ही. आर. चौधरी
संरक्षण दलाच्या प्रमुखपदी आणखी एक मराठी नाव जुडलं जाणार आहे. आर्मी चिफ मुकुंद नरवणे यांच्यानंतर आता हवाई दलाच्या प्रमुख पदी महाराष्ट्राचे सुपुत्र एअर मार्शल विवेक राम चौधरी विराजमान होणार आहेत. भारतीय वायू दलाचे प्रमुख आर.के.एस भदौरीया हे 30 सप्टेंबर रोजी निवृत्त होत आहेत. 1 ऑक्टोबर रोजी मराठवाड्यातील नांदेडचे भूमीपुत्र विवेक चौधरी हे नवे एअर चीफ मार्शल होणार आहे.
SD social media
9850 60 3590