अमेरिकेतील अंतराळ संस्था NASA ने महत्वाकांक्षी मिशनसाठी 10 अंतराळवीरांची (Astronaut) निवड केली आहे. यात अमेरिकी वायुसेनामध्ये लेफ्टनंट कर्नल आणि स्पेसएक्सचे पहिले फ्लाईट सर्जन भारतीय वंशाचे अनिल मेनन (Anil Menon) यांचाही सहभाग आहे.मिनेसोटाच्या मिनीपोलिस मध्ये जन्न झालेले मेनन हे 2018 मध्ये एलन मस्कच्या अंतरिक्ष कंपनी स्पेसएक्सचा (SpaceX) भाग राहिले आहेत. तसंच डेमो-2 अभियानादरम्यान मानवाला अंतराळात पाठवण्याच्या मिशनमध्ये मदत केली होती. इतकंच नाही तर भविष्यातील अभियानांसाठी मानव प्रणालीची मदत करणाच्या चिकित्सा संघटनेची निर्मितीही त्यांनी केली.
अनिल मेनन हे पोलिओ लसीकरणाचा अभ्यास आणि समर्थनासाठी रोटरी एम्बेसेडर म्हणून भारतात एक वर्ष वास्तव्यालाही होते. यापूर्वी 2014 मध्ये ते NASA सोबत जोडले गेले. NASA चे विविध अभियानात फ्लाईट सर्जनची भूमिका साकारत त्यांनी अंतराळवीरांना आंतरराष्ट्रीय अंतराळ केंद्रावर (आयएसएस) पोहोचवलं. 2010 मध्ये हैती तर 2015 मध्ये नेपाळमधील भूकंपादरम्यान, तसंच 2011 मध्ये रेनो एअर शो दुर्घटनेवेळी मेनन यांनी एक चिकित्सक म्हणून पहिली प्रतिक्रिया दिली होती.
वायुसेनेत मेनन यांनी फ्लाईट सर्जन म्हणून 45 वी स्पेस विंग आणि 173 वी फ्लाईट विंगमध्ये सेवा दिली आहे. ते 100 पेक्षा अधिक उड्डाणात सहभागी झाले. तसंच क्रिटिकल केयर एयर ट्रान्सपोर्ट टीमचा भाग बनून त्यांनी अनेक रुग्णांची वाहतूक केली. जानेवारी 2022 मध्ये आंतराळवीर म्हणून प्रशिक्षणाला सुरुवात ते करतील. हे प्रशिक्षण 2 वर्षांपर्यंत चालेल.