त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिराचा परिसर उजळून निघाला.मंदिराच्या कळसासह संपूर्ण गाभाऱ्यात पणत्या लावण्यात आल्या.
मंदिराच्या कळसासह संपूर्ण गाभाऱ्यात पणत्या लावण्यात आल्या.याशिवाय तोरण, फुले, रांगोळ्यांनी मंदिराचा परिसर सजवण्यात आला.गणपती बाप्पाला 521 मिष्टान्नांचा महानैवेद्य दाखवण्यात आला. यात वेगवेगळी फळं, मिठाई, तिखट-गोड पदार्थांचा समावेश आहे.
अन्नकोटाकरीता पदार्थ देण्याचे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले होते. 521 हून अधिक प्रकारचे पदार्थ भाविकांकडून मंदिरात गोळा झाले. ते सर्व पदार्थ अन्नकोटामध्ये मांडण्यात आले.या सर्व पदार्थांचा प्रसाद ससून रुग्णालयात आणि मंदिरातील भक्त यांना देण्यात येणार असल्याचे ट्रस्टतर्फे सांगण्यात आले.
पुणेकरांनी हे दृश्य डोळ्यामध्ये साठवण्यासोबत मोबाईल कॅमेऱ्यामध्ये कैद करण्यासाठी मोठी गर्दी केली.