आरोग्य सेविकेच्या कार्याची राष्ट्रपतींनी घेतली दखल, ‘या’ कारणामुळे मिळाला पुरस्कार
सोलापूर जिल्ह्यातील आरोग्य सेविका मनिषा जाधव यांना राष्ट्रपती द्रोपती मुर्मु यांच्या हस्ते नॅशनल फ्लोरेन्स नाइटिंगेल या पुरस्काराने आज (7 नोव्हेंबर) रोजी सन्मानित करण्यात आले. मनिषा जाधव मागील 16 वर्षांपासून आरोग्य खात्यामध्ये आरोग्य परिचारिका म्हणून आरोग्यसेवा बजावत आहेत. या 16 वर्षांमध्ये केंद्र सरकारतर्फे राबवल्या जाणाऱ्या प्रत्येक आरोग्य विभागाच्या योजनांमध्ये त्यांनी प्रामाणिकपणे आपली सेवा बजावली आहे. त्यांच्या या सेवेचा सन्मान म्हणून त्यांना हा पुरस्कार देण्यात आला.
आरोग्य सेविका मनिषा जाधव यांना हा पुरस्कार बाल आरोग्य आणि परिवार नियोजनातील विशिष्ट सेवांच्या बाबतीत मिळाला आहे. केंद्र शासनातर्फे राबवण्यात येणाऱ्या या दोन योजनांमध्ये त्यांनी आजवर विशेष कामगिरी बजावली आहे. सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील मोरोची या गावात प्राथमिक आरोग्य केंद्रात सध्या मनीषा या कार्यरत आहेत. याच आरोग्य केंद्रातून त्यांची या देशातील सर्वोत्कृष्ट मानल्या जाणाऱ्या पुरस्कारासाठी त्यांची निवड करण्यात आली होती.
सत्तारांच्या अडचणी वाढल्या; महिला आयोगाकडून गंभीर दखल, महासंचालकांना कारवाईच्या सूचना
कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. अब्दुल सत्तार यांच्या या विधानानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यभरात तसंच मुंबईतल्या अब्दुल सत्तार यांच्या शासकीय बंगल्याबाहेर आंदोलन केलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील या प्रकरणाची गंभीर दखल घेत सत्तारांचे कान टोचले. आता राज्य महिला आयोगाने देखील याची दखल घेतली असून पोलीस महासंचालकांना कायदेशीर कारवाई करण्याची सूचना करण्यात आली आहे.
उद्धव ठाकरेंचा राष्ट्रवादीलाच धक्का, पुण्यातल्या नेत्याच्या मुलीने बांधले ‘शिवबंधन’!
जून महिन्यात झालेल्या विधानपरिषद निवडणुकांनंतर शिवसेनेमध्ये उभी फूट पडली. एकनाथ शिंदे यांनी 40 आमदार, 12 खासदार आणि शिवसेना पदाधिकाऱ्यांसह पक्षावर दावा सांगितला, यानंतर शिंदेंकडे मोठ्या प्रमाणावर इनकमिंग सुरू झालं. तर दुसरीकडे उद्धव ठाकरेही पक्षामध्ये वेगवेगळ्या चेहऱ्यांना संधी देत आहेत. आता मात्र उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसलाच धक्का दिला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अंकुश काकडे यांची कन्या मेघना काकडे माने यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला आहे. मातोश्रीवर मेघना काकडे माने यांनी हातात शिवबंधन बांधलं. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी पक्षप्रवेश केला, यावेळी निलम गोऱ्हे, सुषमा अंधारे, अनिल परब, सचिन आहिर, आदेश बांदेकर हे नेते उपस्थित होते. मेघना काकडे माने या मुंबईच्या अंधेरी भागात राहतात.
सामाजिक मागास वर्गाप्रमाणेच आर्थिक मागासांनाही आरक्षणाची गरज, न्यायालयाच्या निर्णयावर नेमकं काय म्हणाल्या पंकजा मुंडे?
अखेर आर्थिक मागास वर्गाला 10 टक्के आरक्षण देण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केले. या निर्णयाचं भाजपकडून स्वागत केलं जात आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपच्या राज्यातील अनेक नेत्यांनी या निर्णयाचं स्वागत केलं. तर दुसरीकडे विरोधकांकडून या निर्णयावर टीका करण्यात येत आहे.
भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाचं स्वागत केलं आहे. मी सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाचं स्वागत करते, आर्थिक मागास वर्गाला 10 टक्के आरक्षण देण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झाल्यानं आर्थिक मागास वर्गाला याचा नक्की फायदा होईल, असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे. तसेच मुंडे यांनी यावेळी आरक्षणाच्या निर्णयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेदेखील आभार मानले आहेत.
सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय, आर्थिक दुर्बल घटकांना मिळणार 10 टक्के आरक्षण
देशात आर्थिक दुर्बल घटकांसाठी आरक्षण लागू होण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. सुप्रीम कोर्टाने ऐतिहासिक निकाल देत आर्थिक दुर्बल घटकांचं आरक्षण वैध ठरवलं आहे. केंद्र सरकारने दिलेल्या 10 टक्के आर्थिक आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयात शिक्कामोर्तब केलं आहे.
आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना सर्वसाधारण प्रवर्गातील 10 टक्के आरक्षण देण्याचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवला आहे. 5 पैकी 3 न्यायाधीशांनी EWS आरक्षणाच्या सरकारच्या निर्णयाला घटनात्मक चौकटीचे उल्लंघन मानले नाही. म्हणजेच हे आरक्षण कायम राहणार आहे. न्यायमूर्ती दिनेश माहेश्वरी, न्यायमूर्ती बेला त्रिवेदी आणि न्यायमूर्ती जेबी पारडीवाला यांनी EWSच्या बाजूने निकाल दिला आहे. पाच पैकी चार न्यायाधीशांनी आरक्षणाच्या बाजूनं आपलं मत नोंदवलं. फक्त घटनापीठातील न्यायमूर्ती भट यांनी आर्थिक आरक्षणाशी असहमती दर्शवली. या आरक्षणामुळे सामाजिक न्याय आणि गाभ्याला धक्का बसेल असं मत भट यांनी व्यक्त केलं.
उपांत्य फेरीच्या सामन्याआधी इंग्लंड संघाला मोठा धक्का, आघाडीचा फलंदाज झाला जायबंदी
भारत विरुद्ध इंग्लंड उपांत्य फेरीच्या सामन्यापूर्वी जोस बटलरच्या संघासाठी एक वाईट बातमी समोर येत आहे. इंग्लिश संघाचा स्टार फलंदाज डेव्हिड मलान दुखापतीमुळे या महत्त्वाच्या सामन्यातून बाहेर पडू शकतो. सोमवारी संघाचा अष्टपैलू खेळाडू मोईन अलीने याला दुजोरा दिला. भारत आणि इंग्लंड यांच्यातील टी२० विश्वचषक २०२२ चा दुसरा उपांत्य सामना १० नोव्हेंबर रोजी अॕडलेड षटकात खेळवला जाणार आहे. बाद फेरीतील या डावखुऱ्या फलंदाजाच्या दुखापतीमुळे संघाच्या अडचणी वाढल्या आहेत.
टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहली पहिल्यांदाच ठरला ‘आयसीसी प्लेयर ऑफ द मंथ’
एक काळ असा होता जेव्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विराट कोहलीचा दबदबा पाहायला मिळत होता, पण गेल्या काही वर्षात किंग कोहलीच्या बॅटमधून धावा निघत नव्हत्या, मात्र ऑक्टोबर २०२२ या महिन्यात विराट कोहलीचे नशीबचं बदलले. तो कुठल्याही मैदानावर त्याला हवी तशी खेळी करताना दिसत आहे. त्यामुळेच विराट कोहलीला दीर्घ काळानंतर आयसीसीकडून हा पुरस्कार देण्यात आला. विराटला ऑक्टोबर २०२२ साठी ‘आयसीसी प्लेअर ऑफ द मंथ’ म्हणून घोषित करण्यात आले आहे.
सोमवार, ७ नोव्हेंबर रोजी, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) पुरुष आणि महिला खेळाडूंची घोषणा केली. पुरुष गटात विराट कोहली आणि महिला गटात पाकिस्तानच्या निदा दारला महिन्यातील सर्वोत्तम क्रिकेटपटू म्हणून गौरवण्यात आले आहे. ऑक्टोबर महिन्यात विराट कोहलीने खूप धावा केल्या. गेल्या महिन्यात विराटने चार सामन्यांत २ अर्धशतके झळकावली, त्यात पाकिस्तानविरुद्ध खेळलेली खेळी ही विशेष होती.
SD Social Media
9850 60 3590