एकनाथ खडसेंनी दुकानदारी बंद करावी : गिरीश महाजन

महाराष्ट्रात सध्या नगर पंचायत निवडणुकीचं वारंसुरु आहे. बोदवड येथील नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचार सभेत माजी मंत्री गिरीश महाजन यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसेंवर जोरदार टीका केलीय. मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीसाठी पळतो, अन् स्वतःच्या मतदारसंघाचा विकास मात्र भकास आणि म्हणे मोठा नेता, असे म्हणत माजी मंत्री गिरीश महाजन यांनी नगरपंचायत निवडणुकीनिमित्त आयोजित प्रचार सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसेंवर जोरदार टीका केली.

गिरीश महाजनं यांनी 15 वर्ष लाल दिव्याची गाडी अन् 12 खाते मिळाले. आणि तरीही एकनाथ खडसे मतदारसंघाचा विकास करू शकले नाही. चुकीच्या वागणुकीमुळे लोकांनी तुम्हाला शिक्षा दिलीय. कमिशनसाठी लल्लु पंजु भांडतात आणि कसा विकास होईल. आता कितीही आवाज चढवला तुमची धार बोथट झाली आहे. आता तुमचं खरं नाही दुकानदारी बंद करा असा टोला देखील महाजनांनी एकनाथ खडसेंना लगावला.

ज्या वेळेस एकनाथ खडसे समोरील प्रचारसभेत खडसे शेरोशायरी करत असल्याचे ऐकताच. त्यावर गिरिश महाजनांनी खडसेंवर टीकेची संधी साधली. शेरोशायरी करता स्वत:ला तुम्ही सव्वाशेर म्हणवून घेतात ते तुम्हाला लिहून देताना तुम्ही वाचतात. तुमचं हेच का आता की तुम्ही शेरो शायरी करावी. मात्र, आता तुमचा दबदबा राहिलेला नाही. तुम्ही सव्वाशेर नाही आता पावशेर झाले असल्याचा टोलाही महाजनांनी खडसेंना लगावला.

एकनाथ खडसे मतदारांना सांगतात, गिरीशभाऊंना मोठं केल. मला कुणी मोठं केलं नाही विकासकामांमुळे मी मोठा झालो. लोकांची कामे करावी लागतात. लोकांची सेवा केली म्हणून आतापर्यंत लोकांनी निवडून दिलं. कमीत कमी 25 हजार च्या लीड ने निवडून दिलं आहे. मी आतापर्यंत कधी पंचवीस हजाराच्या खाली आलो नाही. तुम्ही तर कधी अठराशे रुपये अठराशे मताने कधी आठ हजार मतांनी असे निवडून आले आहेत, असं देखील गिरीश महाजन म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.