रविना टंडन आणि ‘शोले’फेम सांबाचं आहे हे खास नातं;ऐकून तुम्हालाही वाटेल आश्चर्य! रविनाचा आज वाढदिवस

बॉलिवूडमध्ये मस्त-मस्त गर्ल म्हणून प्रसिद्ध असलेल्या रवीना टंडनने 1991 मध्ये ‘पत्थर के फूल’ या चित्रपटातून तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली होती. या चित्रपटात सलमान खान तिचा नायक होता. पहिल्याच चित्रपटापासून रवीनाने प्रेक्षकांच्या मनावर मोहोर उमटवली होती. यानंतर तिने ‘मोहरा’, ‘दिलवाले’, ‘अंदाज अपना-अपना’, ‘दुल्हे राजा’ यांसारख्या अनेक चित्रपटांतून आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे. तिने तिच्या काळातील सर्व मोठ्या कलाकारांसोबत काम केलं आहे.

रविनाचं सांबा कनेक्शन-

26 ऑक्टोबर 1974 रोजी मुंबईत जन्मलेली रवीना एका फिल्मी कुटुंबातील आहे. तिचे वडील रवी टंडन हे त्या काळातील प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माता होते. त्यांनी ‘नजराना’, ‘एक मैं और एक तू’, ‘खेल’, ‘खुद्दार’ आणि ‘वक्त की दीवार’ सारखे चित्रपट केले आहेत. तसेच, तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की रवीना टंडन प्रसिद्ध चरित्र कलाकार मॅक मोहनची भाची आहे. तोच मॅक मोहन ज्याने शोले चित्रपटात सांबा ही व्यक्तिरेखा साकारली होती.शा परिस्थितीत अभिनयाचा परिणाम रवीनावर होणं साहजिक होतं. वयाच्या १७ व्या वर्षी रवीनानं इंडस्ट्रीत पदार्पण केलं होतं.

1995 मध्ये, रविनाची फिल्मी कारकीर्द थोडीशी ढासळली होती, परंतु तिने पुन्हा स्वतःला बॉक्स ऑफिसवर ‘खतरों के खिलाडी’ चित्रपटाद्वारे हिट नायिका म्हणून सिद्ध केलं. 1998 मध्ये रिलीज झालेल्या ‘बडे मियाँ-छोटे मियाँ’ या चित्रपटाने भरपूर कमाई केली होती. हा चित्रपट त्या वर्षातील दुसरा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला होता. नुकतीच या चित्रपटाला प्रदर्शित होऊन 23 वर्षे पूर्ण झाली आहेत. रवीनाने तिच्या इंस्टाग्रामवर या चित्रपटाशी संबंधित एक पोस्टही शेअर केली आहे.

1999 मध्ये तिने ‘शूल’ हा चित्रपट केला होता. या चित्रपटात लोकांनी रवीनाला पहिल्यांदा ग्लॅमरलेस पात्रात पाहिलं होतं. चित्रपटातीलतिच्या कामाचं सर्वांनी कौतुक केलं होतं. त्यानंतर अभिनेत्रीने 2001 मध्ये कल्पना लाजमीचा ‘दमन’ हा चित्रपट केला होता. या चित्रपटातून तिने आपण एक उत्तम अभिनेत्री असल्याचं सिद्ध केलं होतं. या चित्रपटासाठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला होता. 2003 साली आलेल्या ‘सत्ता’ आणि 2004 साली आलेल्या ‘दोबारा’ चित्रपटातील तिच्या कामाची समीक्षकांनी खूप प्रशंसा केली होती.

पुन्हा केलं कमबॅक-

रवीनाही काही काळ चित्रपटांपासून दूर राहिली होती. यादरम्यान तिने आपल्या कुटुंबाला वेळ दिला. जेव्हा ती चित्रपटांमध्ये परतली तेव्हा तिने पुन्हा सिद्ध केलं की आजही तिचा अभिनय त्याच पट्ट्यातील आहे. ती आजही आपल्या कामासाठी तितकीच तत्पर आहे. 2017 मध्ये तिने ‘मातृ’ चित्रपटात दमदार भूमिका साकारली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.