महाराष्ट्रात कोरोना आणि ओमिक्रॉन व्हेरिएंटचे रुग्ण मोठ्या संख्येनं आढळत असल्याचं समोर आलं आहे. रुग्णसंख्या वाढल्यामुळे आरोग्य व्यवस्थेची झोप उडाली आहे. महाराष्ट्रात अजूनही रोज 40 हजार आसपास नवे कोरोना रुग्ण आढळत आहेत. राज्यात मंगळवारी दिवसभरात 39207 नवे कोरोनाग्रस्त आढळले. तर एकूण 53 जणांचा मृत्यू झाला. दिवसभरात 12810 रुग्ण कोरोनामुक्त झाले.
मुंबईत मंगळवारी 6149 नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली तर सात जणांचा मृत्यू झाला. मुंबईत मागील काही दिवसांपासून कोरोनाग्रस्तांची संख्या कमी-जास्त होत आहे. असे असले तरी सध्या मुंबईत संसर्ग कमी झालेल नाही. म्हणूनच नागरिकांनी कोरोना नियमांचे पालन करा, असे आवाहन केले जात आहे.
पंढरपूर मंगळवेढा सब जेलमधील कैद्यांना कोरोनाची लागण.सबजेल मधील 8 कैदी कोरोना पॉझिटिव्ह 39 कैद्यांची रॅपिड टेस्ट केल्यानंतर कैद्यांना कोरोना झाल्याचे झाले स्पष्ट. या अधी काही पोलिसांना झाला होता संसर्ग
कैद्यांचा आणि पोलिसांचा संपर्क आला असेल तर मंगळवेढा सब जेल बंदोबस्तात असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची तपासणी करावी लागणार.
नागपूर महापालिकेत कोरोनाचा शिरकाव झाला असून डझनभर अधिकारी कोरोना पॉझिटिव्ह आहेत. कामकाज प्रभावित, संपर्कात आलेल्यांच्या मनात भीतीचं वातावरण. कोरोना नियंत्रणात ठेवण्यासाठी काम करणारे अधिकारीच बाधित झाल्याने वाढली चिंता.