दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आजपासून पार्लमध्ये वनडे मालिकेला सुरुवात होणार आहे. नियमित कर्णधार रोहित शर्मा दुखापतग्रस्त असल्यामुळे त्याच्याजागी प्रथमच केएल राहुल वनडेमध्ये नेतृत्व करणार आहे. सात वर्षात विराट कोहली (Virat Kohli) पहिल्यांदाच एक सामान्य खेळाडू म्हणून संघात खेळणार आहे. या वनडे मालिकेच्या निमित्ताने केएल राहुलची कर्णधार म्हणून क्षमता तपासली जाईल. मोक्याच्याक्षणी राहुल सल्ल्यासाठी विराटवरच अवलंबून असेल. या मालिकेचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे जसप्रीत बुमराह उपकर्णधार आहे.
कसोटी मालिका 2-1 अशी जिंकल्यामुळे दक्षिण आफ्रिकेचा आत्मविश्वास उंचावलेला आहे. इंग्लंड विरुद्ध राहुल मधल्या फळीत खेळला होता. पण उद्या दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तो शिखर धवनसह सलामीला उतरेल. देशांतर्गत क्रिकेटमध्ये दमदार प्रदर्शन करणाऱ्या ऋतुराज गायकवाडला आणखी वाट पहावी लागू शकते. शिखर धवनसाठी ही मालिका महत्त्वाची आहे. कारण टी-20 मध्ये धवनने जवळपास आपलं स्थान गमावलचं आहे.
भारतीय संघ: केएल राहुल (कर्णधार), जसप्रीत बुमराह, शिखर धवन, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, सुर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, वेंकटेश अय्यर, ऋषभ पंत (विकेटकिपर), इशान किशन (विकेटकिपर), यजुवेंद्र चहल, आर.अश्विन, भुवनेश्वर कुमार, दीपक चहर, शार्दुल ठाकूर, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज, जयंत यादव, नवदीप सैनी
भारत आणि दक्षिण आफ्रिकेत पहिली वनडे कधी आहे? भारत आणि दक्षिण आफ्रिकेत पहिली वनडे आज 19 जानेवारी 2022 रोजी आहे. तीन सामन्यांची ही सीरीज आहे.
पहिली वनडे किती वाजता सुरु होणार? बुधवारी भारतीय वेळेनुसार पहिली वनडे दुपारी 2 वाजता सुरु होईल. टॉस दुपारी 1.30 वाजता होईल.
भारत आणि दक्षिण आफ्रिकेत पहिली वनडे कुठे आहे? पार्लच्या बोलँड पार्कवर भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये पहिली वनडे आहे.
भारत आणि दक्षिण आफ्रिकेमधल्या पहिल्या वनडेचं कुठे प्रेक्षपण होणार आहे? भारत आणि दक्षिण आफ्रिकेमधल्या तीन मॅचच्या वनडे सीरीजचं स्टार स्पोटर्सवर वर लाइव्ह प्रक्षेपण होणार आहे.