रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या रेपोमध्ये वाढ झाली आहे. यामुळे गृहकर्जा साठीचे व्याजदर महाग झाले आहेत. पण, या सणासुदीच्या काळात अनेक बँका ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी स्वस्तात गृहकर्ज देत आहेत. मग या बँका कोणत्या, ते जाणून घ्या.
बँक ऑफ इंडिया : बँक ऑफ इंडियानेही सणासुदीच्या काळात व्याजदर कमी केले आहेत. बँकेचे गृहकर्जाचे दर आता 8.30 टक्क्यांपासून सुरू होत आहेत. तसेच, 31 डिसेंबर 2022 पर्यंत गृहकर्ज घेणाऱ्या ग्राहकांकडून बँक यापुढे प्रक्रिया शुल्क आकारणार नाही. ही ऑफर जमीन खरेदी करण्यासाठी, घर बांधण्यासाठी, घराची दुरुस्ती करण्यासाठी किंवा नवीन घर किंवा अपार्टमेंट खरेदी करण्यासाठी वापरली जाऊ शकते.
SBI होम लोन : स्टेट बँक ऑफ इंडियाने सणासुदीच्या काळात गृहकर्जाच्या व्याजदरात 0.25 टक्के कपात केली आहे. बँक टॉप अप कर्जावर 0.15 टक्के आणि मालमत्तेवरील कर्जावर 0.30 टक्के सूट देत आहे. बँकेने जानेवारी 2023 पर्यंत प्रक्रिया शुल्क न आकारण्याचा निर्णय घेतला आहे. आता बँकेचे गृहकर्जाचे व्याजदर 8.40 टक्क्यांपासून सुरू होत आहेत.
एचडीएफसी बँक : एचडीएफसी दिवाळीला स्वस्त गृहकर्ज देत आहे. ज्यांचा क्रेडिट स्कोअर 750 पेक्षा जास्त आहे त्यांना 8.40 टक्के दराने गृहकर्ज दिले जात आहे. या ऑफरचा लाभ 30 नोव्हेंबरपर्यंत घेता येईल.
बजाज फायनान्स : बजाज हाउसिंग फायनान्सने पगारदार लोक आणि व्यावसायिकांसाठी दिवाळीनिमित्त खास ऑफर आणली आहे. बँक आता या लोकांना वार्षिक 8.2 टक्के दराने गृहकर्ज देत आहे. ही ऑफर 14 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबरपर्यंत केवळ निवडक ठिकाणांसाठी वैध आहे.
बँक ऑफ महाराष्ट्र -: बँक ऑफ महाराष्ट्रने सणांच्या दिवशी गृहकर्जाच्या व्याजदरात 30 ते 70 बेसिस पॉइंट्सची कपात केली आहे. बँकेचे गृहकर्ज 8 टक्क्यांपासून सुरू होत आहे.