शिक्षणासाठी मोबाईल न मिळाल्याने नांदेडमध्ये विद्यार्थ्यांची आत्महत्या

शिक्षणासाठी मोबाईल घेण्याची ऐपत नसल्याने एका विद्यार्थिनीने आत्महत्या केली आहे. नांदेडमध्ये ही धक्कादायक घटना समोर आली आहे.

नांदेड जिल्ह्यातील नायगाव शहरात राहणाऱ्या एका 17 वर्षीय विद्यार्थिनीने आत्महत्या केली आहे. या विद्यार्थिनीला दहावीला 75 टक्के गुण मिळाले होते. तिला बारावीच्या परीक्षेसाठी अभ्यास करायचा होता. त्यासाठी तिने आई-वडिलांकडे मोबाईल हवा असा हट्ट धरला होता.

मात्र तिच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हलाखीची होती. तिचे वडील हे मोलमजुरी करतात. त्यामुळे ते तिला मोबाईल घेऊन देऊ शकले नाही. यामुळे हताश झालेल्या एका गुणवान तरुणीने गळफास घेऊन जीवन संपवले.

कोरोनामुळे शाळा बंद असल्याने, सरकार आणि शाळांनी ऑनलाईन शिक्षणाचा पर्याय निवडला. पण या ऑनलाईन शिक्षणाचा गावांमध्ये काहीही फायदा होत नाही. खेड्य़ांमध्ये सुविधा नाही. याचा विचार होणं गरजेचं होतं. पण तसं झालं नाही.

त्यातच खेड्यापाड्यात आधीच आर्थिक स्थिती हालखीची असते. मोलमजुरी करुन हातावर पोट भरणाऱ्या कुटुंबात स्मार्टफोन इंटरनेट यासर्व गोष्टी फार दुर्मिळ असतात. एकीकडे बिकट आर्थिक परिस्थिती तर दुसरीकडे शैक्षणिक वर्ष वाया जाण्याची भीती यामुळे बरेच विद्यार्थी आत्महत्या करत आहे. त्यामुळे यावर सरकारने लवकरात लवकर उपाययोजनाची करण्याची गरज आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.