कशी आहे आशिया चषक विजेत्या संघाला मिळणारी ट्रॉफी? 

आशिया चषकाचे सामने लवकरच सुरु होणार आहेत. 20 ऑगस्टपासून पात्रता फेरीच्या सामन्यांना झाली आहे. पण त्यानंतर 27 ऑगस्टला स्पर्धेतला पहिला सामना खेळवण्यात येईल. तर 11 सप्टेंबरला अंतिम सामना खेळवला जाईल. यंदाच्या स्पर्धेत एकूण 6 संघ सहभागी झाले आहेत. यंदा ही स्पर्धा टी20 फॉरमॅटमध्ये होणार आहे. दरम्यान याच स्पर्धेच्या विजेत्या संघाला मिळणारी ट्रॉफी कशी असेल याचा एक व्हिडीओ एशियन क्रिकेट काऊन्सिलनं शेअर केला आहे. दोन दिवसांपूर्वी यूएई क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष शेख नहायम मबारक यांच्या उपस्थितीत या ट्रॉफीचं अनावरण झालं होतं. त्यावेळी इतर क्रिकेट बोर्डाचे पदाधिकारी उपस्थित होते.

गतविजेती टीम इंडिया पुन्हा ट्रॉफी राखणार?

1984 पासून आशिया चषक स्पर्धा खेळवण्यात येत आहे. भारत या स्पर्धेतला सर्वात यशस्वी संघ आहे. भारतानं आतापर्यंत 7 वेळा आशिया चषक उंचावला आहे. 2018 साली बांगलादेशला हरवून शेवटची आशिया चषक स्पर्धा जिंकली होती. आता पुन्हा एकदा आशिया चषक स्वत:कडेच राखण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न राहील. यंदा या स्पर्धेत भारतासह पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका आणि अफगाणिस्तान हे संघ सहभागी होणार आहेत. तर पात्रता फेरीतून एक संघ मुख्य स्पर्धेत एन्ट्री घेईल.

श्रीलंकेचा प्रत्येक स्पर्धेत सहभाग

आशिया चषकाचं यंदाचं 15 वं वर्ष आहे. पण श्रीलंका वगळता एकाही संघानं सर्वच्या सर्व आशिया चषक स्पर्धांमध्ये सहभाग घेतलेला नाही. श्रीलंका मात्र 1984 पासून प्रत्येक स्पर्धेत सहभागी झाली आहे. इतकच नव्हे तर श्रीलंकेनं पाच वेळा आशिया चषक जिंकला आहे. भारत 1986 साली या स्पर्धेत सहभागी झाला नाही. तर 1990 साली पाकिस्ताननं माघार घेतली होती. पाकिस्ताननं 2000 आणि 2012 साली ही स्पर्धा जिंकली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.